आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: धक्कादायक; एकलहऱ्याचे अाैष्णिक विद्युत निर्मिती केंद्र गुंडाळण्याचा घाट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकच्या वैभवात मानाचा तुरा असलेल्या प्रकल्पापैकी एक असा एकलहरा अाैष्णिक विद्युत प्रकल्प गुंडाळण्याच्या हालचाली सुरू झाल्या अाहेत. या केंद्रातील दाेन वीजनिर्मिती संच बंद पडल्यानंतर अाता तिसरा संचही बंद पडण्याच्या मार्गावर अाहे. याव्यतिरिक्त अन्य दाेन संचांची अायुर्मर्यादा संपल्यामुळे ताेटा पत्करून खर्च केला जात असून, याबदल्यात नवीन वीज संच देण्याचा मुख्यमंत्र्याचा शब्दही हवेत विरल्याचा अाराेप शिवसेनेने केला. हा प्रकल्प गुंडाळल्यानंतर १० हजार कामगारांचा राेजगार जाणार असून, नाशिकच्या अर्थव्यवस्थेला माेठा फटका बसणार असल्याची भीती व्यक्त करीत यासंदर्भात सर्वपक्षीयांची माेट बांधण्याचा निर्णय घेतल्याचे महानगरप्रमुख तथा पालिका विराेधी पक्षनेते अजय बाेरस्ते यांनी स्पष्ट केले.
 
एकलहरा वीज निर्मिती प्रकल्पाबाबत बाेलताना बाेरस्ते म्हणाले की, येथील पाचपैकी एक दाेन क्रमांकाचे प्रति १४० मेगावॅट विद्युत निर्मिती क्षमतेचे दाेन प्रकल्प जानेवारी २०११ मध्येच बंद पडले अाहेत. याव्यतिरिक्त तीन संच सुरू असून, यातील तीन क्रमांकाचा संच बंद पडल्याची बाब मंगळवारी दुपारी वाजता महाजनकाेच्या अहवालावरून स्पष्ट झाली. उर्वरित दाेन संच नावापुरतेच सुरू अाहेत. दुसरीकडे या संचाच्या बदल्यात ६६० मेगावॅट क्षमतेचा वीजनिर्मिती संच देण्याचे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच कबूल केले हाेते. प्रत्यक्षात नवीन संच देताना नाशिकला बगल दिली गेली. मात्र, परळीला २५० मे. वॅ. क्षमतेचे तीन, पारसला २५० मे. वॅ. क्षमतेचे २, भुसाळवला ५०० मे. वॅ. क्षमतेचे २, काेराडीला ६६० मे. वॅ. क्षमतेचे ३, चंद्रपूरला २५०, ५५० ६६० मे. वॅ. क्षमतेचे तीन, खापरखेड्याला ६६० मे. वॅ. क्षमतेचे एक असे नवीन संच दिले गेले. वास्तविक अाैष्णिक वीजनिर्मिती केंद्रासाठी अावश्यक जागा, पाणी सर्वात महत्त्वाचा म्हणजे ज्या समुद्रालगत मुबलक काेळसा उपलब्ध हाेताे ते ठिकाण नाशिकपासून काही किलाेमीटर अंतरावर असताना अापल्याला वगळले का हा महत्त्वाचा प्रश्न अाहे. 
 
हा प्रकल्प बंद झाल्यास राेजगाराला माेठा फटका बसणार असून, नाशिकच्या संपत्तीतील महत्त्वाचा भाग असलेला प्रकल्पही जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. येथील जमिनीही नापीक झाल्या असून, त्याचाही फायदा जमीनमालकांना हाेणार नाही. दुसरीकडे सिन्नरमधील इंडिया बुल्स डहाणू येथील वीज प्रकल्पावर सर्व लक्ष केंद्रित असून खासगी प्रकल्पांना प्राेत्साहन देण्याचे धाेरण तर नाही ना, असाही प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे प्रकल्प सुरू राहावा यासाठी शिवसेना सर्वपक्षीयांना बराेबर घेऊन अभियान राबवणार अाहे. त्यात भाजपलाही सहभागी करून घेतले जाणार अाहे. जे येतील ते साेबत अाणि जे येणार नाही त्यांच्याव्यतिरिक्त नाशिककराचंी माेट बांधणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी निवृत्त अभियंता अमित पाटील यांनी याबाबतची तांत्रीक माहिती देत प्रकल्प कसा बंद पडणार याची कागदपत्रेही सादर केली. या कागदपत्रांच्याद्वारे हा प्रकल्प गुंडाळण्याच्या हालचाली सुरू असल्याचे दिसून येत अाहे. 
 
चिमणीचीच अडचण
एकलहरा येथे नवीन वीज संच देण्याबाबत केवळ अाश्वासनांचे गाजर दाखवले गेले असून २०१९ मध्ये प्रकल्प सुरू हाेईल असे सांगितले जाते. प्रत्यक्षात त्याबाबत काेणतेही ठाेस अाश्वासन नाही. नाशिकमधून हा महत्त्वपूर्ण प्रकल्प हलवण्यामागे चिमणीचीच मुख्य अडचण असल्याचे सांगत १७० मीटर उंचीपेक्षा अधिक चिमणी असू नये असे गांधीनगर एअरपाेर्ट अॅथाॅरिटीचे म्हणणे अाहे. या मागणीअाडूनच हा अाैष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प बंद पाडण्यासाठी हालचाली हाेत असल्याचे बाेरस्ते यांनी सांगितले. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, सर्वपक्षीय संघर्ष करणार...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...