आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'काबिल\' डावलून \'रईस\'ना तिकीट; नाराजांची \'दंगल\' शिवसेना, भाजप, काँग्रेसमध्ये उफाळली बंडाळी(महाकौल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गेले अनेक महिने निवडणुकीची तयारी करूनही एेनवेळी पक्षाने पत्ता कट करून इतरांनाच उमेदवारी दिल्यामुळे संतप्त झालेल्या नाशिकमधील शिवसैनिकांच्या संतापाचा स्फाेट झाला. शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बाेरस्ते अाणि माजी महापाैर विनायक पांडे यांच्यात जाेरदार हाणामारी झाली. याच कारणावरून भाजपमधील नाराजांनी पक्षाचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांना अक्षरश: शिव्यांची लाखाेली वाहिली. दुसरीकडे,  काँग्रेसच्या नाराज कार्यकर्त्यांनीही नेत्यांविराेधात निदर्शने करत अापल्या  पक्ष कार्यालयाला टाळे ठाेकले. पक्षाने पैसे घेऊन तिकिटे विकली, एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर अन्याय केला, अशीच भावना या तिन्ही पक्षांच्या नाराज कार्यकर्त्यांतून व्यक्त हाेत हाेती. 
 
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी अखेरचा दिवस हाेता. बंडखाेरीच्या भीतीने शिवसेनेने अखेरच्या दिवसापर्यंत यादी जाहीर केली नाही. शेवटच्या दिवसापर्यंत स्थानिक नेत्यांनी एका जागेसाठी अनेकांना अाश्वासने दिली हाेती. मात्र एेनवेळी एकाचेच नाव निश्चित करून त्यांनाच एबी फाॅर्मचे वाटप झाल्यामुळे इतर इच्छुक शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली.  प्रभाग १३ मधून विनायक पांडे यांनी स्वत:साठी, तर प्रभाग २४ मधून चिरंजीव ऋतुराज यांच्यासाठी उमेदवारी मागितली हाेती.मात्र एका घरात दाेघांना उमेदवारी देता येणार नसल्याचे बाेरस्ते यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पांडे संतप्त झाले. दाेन्ही गट हमरीतुमरीवर उतरले. धक्काबुक्कीही झाली. मात्र नंतर प्रकरण मिटवण्यात अाले. 

ठाण्यात अामदारास धक्काबुक्की
ठाणे- पैसा घेऊन तिकीट वाटप केल्याचा अाराेप करत भाजपच्या दाेन गटांमध्ये शुक्रवारी पक्ष कार्यालयात हाणामारी झाली, यात एक जण जखमी झाला. पक्षाचे काम करूनही अाम्हाला डावलले जात असल्याचा अाराेप करत त्यांनी भाजप अामदार रवींद्र चव्हाण यांना धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न केला.

भाजपमधील इच्छुकांचा अात्मदहनाचा इशारा
शिवसेनेत राडा सुरू असतानाच भाजपमध्येही वेगळी स्थिती नव्हती. पक्षाच्या वसंत स्मृती कार्यालयात एबी फाॅर्मचे वाटप करण्यात अाले. ज्यांना तिकिटे नाकारण्यात अाली, त्यांनी शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांना घेराव घालत जाब विचारला, काहींनी शिवीगाळही केली.  प्रभाग क्रमांक ३१ मधील इच्छुक शारदा दाेंदे यांनी तर अात्मदहनाचाच इशारा दिला. त्यामुळे नेते गर्भगळीत झाले.  प्रभाग १६ मधील काही उमेदवारांनी पक्षाने तिकिटे विकल्याचा अाराेप केला. काँग्रेसमधून तिकीट नाकारल्याने प्रभाग ५ मधील इच्छुक उमेदवार पांडुरंग बाेडके व त्यांच्या समर्थकांनीही पक्षनेत्यांवर तिकिटे विकल्याचा अाराेप केला, तसेच कार्यालयाला टाळेच ठाेकले. दरम्यान, भाजपमध्ये ज्यांना तिकीट नाकारले त्यापैकी काहींनी एेनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवली. तर मनसेच्या गाेटात मात्र दिवसभर शांतता हाेती. 
 
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, तिकीट वाटपाच्या वादातून नाशिक, अमरावती पुण्यात काय घडले...
बातम्या आणखी आहेत...