आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादी काँग्रेससमाेर शिवसेनेचे अाव्हान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवला - नगरपालिकेच्या प्रभाग मध्ये पुरुष सर्वसाधारण जागेवर परदेशी काका-पुतण्याचा सामना हाेत अाहे. तर याच प्रभागात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव जागेसाठीही ‘परदेशीं’मध्ये लढत रंगणार अाहे. या जागेसाठी राष्ट्रवादीने नगरसेविका नीता परदेशी यांना उमेदवारी दिली अाहे तर शिवसेनेने माया परदेशी यांना उमेदवारी देऊन नीता परदेशींसमाेर अाव्हान उभे केले अाहे. याच जागेवर मनसेच्या महिला अाघाडीच्या शहराध्यक्षा नीलम घटे या अपक्ष रिंगणात अाहेत. त्यामुळे या तिरंगी लढतीत मतदार काेणाला पसंती देतात हे पाहणे अाैत्सुक्याचे ठरणार अाहे.
नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला राखीव जागेसाठी चुरशीचा सामना हाेत अाहे. राष्ट्रवादीचा सामना करण्यासाठी शिवसेनेने राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या माया परदेशी यांना उमेदवारी दिल्याने येथे अटीतटीची लढत रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात अाहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार नीता परदेशी या नगरसेविका असून, पक्षाने दुसऱ्यांदा त्यांना उमेदवारी देत त्यांच्यावर विश्वास टाकला अाहे. त्यांचे पती संताेष परदेशी हेही माजी नगरसेवक अाहेत. संताेष परदेशी दाेनदा नगरसेवक राहिले असून, या प्रभागात त्यांचा चांगला जनसंपर्क अाहे. त्याचा फायदा नीता परदेशी यांना हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात अाहे. शिवसेनेच्या उमेदवार माया परदेशी याही वजनदार उमेदवार अाहेत. सावित्रीबाई फुले सेवाभावी संस्थेच्या त्या अध्यक्षा असून, त्या माध्यमातून त्यांनी चांगली कामे केली अाहेत. तसेच शासनाच्या विविध महामंडळांकडून मिळणाऱ्या याेजनांचा फायदाही लाभार्थ्यांना मिळवून दिला अाहे. त्यामुळे त्यांचाही संपर्क चांगला अाहे. अपक्ष उमेदवार नीलम घटे या मनसेच्या महिला अाघाडीच्या शहराध्यक्षा अाहेत. देवांग काेष्टी समाज महिला मंडळाच्या माजी उपाध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम पाहिले अाहे. तसेच नागरी प्रश्नांवर त्यांनी अांदाेलनाच्या माध्यमातून अावाज उठवला अाहे. या प्रभागात मुस्लिम समाजाचे प्राबल्य असून, त्यांचा पाठिंबा ज्या उमेदवाराला मिळेल त्याच्या विजयाचे पारडे जड मानले जात अाहे. नागपुरे, कासार, परदेशी, काेष्टी, धाेबी, मराठा अादी समाजांचेही वर्चस्व अाहे.

अपक्ष उमेदवार नीलम घटे यांनी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली हाेती. परंतु, शिवसेनेने माया परदेशी यांना उमेदवारी दिल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली अाहे. मनसेने ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने घटे यांनी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली हाेती.
बातम्या आणखी आहेत...