आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादी, शिवसेनेसमाेर अपक्षाचे कडवे अाव्हान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवला - शहरात ज्या काही चुरशीच्या लढती हाेत अाहे. त्यापैकीच एक म्हणजे शहरातील मध्यवर्ती भागातील प्रभाग क्रमांक मधील तिरंगी लढत. या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उमेदवारांसमाेर अपक्ष उमेदवारांनी अाव्हान निर्माण केल्याने सर्वसाधारण जागेवर चुरशीची लढत रंगणार अाहे.
मारवाडी, गुजराथी समाजाचे प्राबल्य असलेल्या या प्रभागात सर्वसाधारण जागेवर शिवसेनेकडून सूरज (सनी)पटणी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विद्यमान नगरसेवक रवींद्र जगताप तर अपक्ष उमेदवार म्हणून भाजपचे विद्यमान नगरसेवक सुनील काबरा यांच्या तिरंगी सामना हाेणार अाहे. माजी नगराध्यक्ष पंकज पारख, उद्याेगपती सुशीलचंद्र गुजराथी यांनी या प्रभागाचे अनेक वेळा नेतृत्व केले अाहे. मात्र, यावेळी सर्वसाधारण जागा असतानाही या कुटुंबातील एकाही सदस्याने उमेदवारी केलेली नाही. त्यामुळे ते या निवडणुकीत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष अाहे. शिवसेनेचे उमेदवार सूरज पटणी यांना दराडे यांचे पाठबळ असून, शिंदे परिवाराशी त्यांचे निकटचे संबंध अाहेत. त्यांची गॅस एजन्सी असल्याने त्यांचा जनसंपर्क चांगला अाहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नगरसेवक रवींद्र जगताप हे शासकीय ठेकेदार अाहेत. शहरात अामदार भुुजबळ यांच्यामुळे जी विकासकामे झाली अाहेत त्यांच्यात यांचाही समावेश अाहे. मारवाडी समाजातून दाेन उमेदवार रिंगणात असल्याने दाेघांच्या मत विभागणीचा कितपत फायदा जगताप यांना मिळताे, यावरच त्यांच्या विजयाचे गणित अवलंबून अाहे. गत वेळी अामदार भुजबळ यांनी जगताप यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली हाेती. यावेळी ते पालिकेच्या पुढील दरवाज्याने प्रवेश करण्यासाठी प्रयत्नशील अाहेत. राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष पंकज पारख नीलेश पटेल या दाेघांचीही ताकद त्यांच्या पाठीशी असल्याने येथे चुरशीचा सामना हाेणार अाहे.

अपक्ष उमेदवार विद्यमान नगरसेवक सुनील काबरा यांनी राष्ट्रवादी शिवसेनेच्या उमेदवारांसमाेर अाव्हान उभे केले अाहे. सुनील काबरा हे भाजपचे नगरसेवक अाहेत. स्व. रामनारायणजी काबरा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून काबरा कुटुंबीयांचे शहरात माेठे सामाजिक कार्य उभे अाहे. समाेरच्याची साेपी लढत अवघड करून विजयाची चव स्वत: कशी चाखायची ही सवय काबरांकडे अाहे. त्यामुळे पक्षीय उमेदवारांसमाेर त्यांनी माेठे अाव्हान निर्माण केले अाहे.

या प्रभागात मारवाडी, गुजराथी समाजाबराेबरच परदेशी, नाभिक, मेहतर, मुस्लिम, साळी, काेष्टी, ब्राह्मण, भावसार, लिंगायत समाजाचेही वर्चस्व अाहे. कुबेराचा प्रभाग म्हणून शहराला परिचित अाहे. पडद्याअाडूनही माेठ्या राजकीय हालचाली या प्रभागात सुरू अाहे. प्रभागात मतदान नसतानाही काबरा उमेदवार झाले कसे, याचीही चर्चा सुरू अाहे. जावळे कुटुंबातील उमेदवार या निवडणुकीत नसल्याने त्यांच्या भुमिकेकडेही लक्ष अाहे. प्रभागात नगरपालिकाराेड, परदेश पुरा, टिळक मैदान, साळी गल्ली, देशपांडे गल्ली, मेनराेडचा काही भाग, कुंडीचा हाैैद, राणा प्रताप चाैक, लाेणार गल्लीचा काही भाग समाविष्ट अाहे.

सनी पटणी
रवींद्र जगताप
सुनील काबरा
प्रभाग क्रमांक :
जागा: सर्वसाधारण
एकूण मतदार ३५४२
पुरुष मतदार १७८७
स्त्री मतदार १७५५
बातम्या आणखी आहेत...