आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थकारणात थंडावले निवडणुकीचे राजकारण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पाचशे अाणि हजारांच्या नाेटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर सर्वत्र केवळ याच विषयांवर चर्चा झडत असून, या गदाराेळात महापालिका निवडणुकीचा अावाजही दबला अाहे. गेल्या तीन दिवसांपासून काेणत्याही प्रमुख राजकीय पक्षांच्या बैठका झाल्या नसून, इच्छुक उमेदवारदेखील हातावर हात धरून बसले अाहेत. दुसरीकडे या निर्णयाची जाहिरातबाजी करीत भाजपचे इच्छुक उमेदवार अापला प्रचार करून घेताना दिसत अाहेत.
महापालिकेची निवडणूक अवघी अडीच महिन्यांवर येऊन ठेपली अाहे. यंदा चार सदस्यीय प्रभागरचनेप्रमाणे ही निवडणूक हाेणार असल्याने प्रत्येकाला प्रचार करताना जिवाचे रान करावे लागणार अाहे. त्यासाठी अातापासूनच इच्छुकांनी प्रचार सुरू केला अाहे. अर्थात काेणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची हे बहुतांश इच्छुकांनी अजूनही ठरविलेले नाही. एेनवेळी येणाऱ्या परिस्थितीनुरूप निर्णय घेऊन निवडणुकीला सामाेेरे जाण्याचे धाेरण अनेकांनी ठरविले अाहे.
मात्र, दरम्यानच्या काळात अधिकाधिक मतदारांपर्यंत पाेहोचून निवडणूक लढविण्यामागील अापली भूमिका इच्छुकांकडून स्पष्ट केली जात अाहे. त्यासाठी विविध उपक्रमदेखील राबविण्यात येत अाहेत. दुसरीकडे शिवसेना अाणि भाजपच्या युतीविषयीदेखील चर्चा सुरू झाली अाहे. काँग्रेस, राष्ट्रवादी अाणि अन्य समविचारी पक्षांची अाघाडी जवळपास निश्चित असली तरी यात मनसेला घ्यायचे की नाही, यावर अद्याप शिक्कामाेर्तब झालेले नाही. या सर्वच राजकीय घडामाेडींच्या पार्श्वभूमीवर बैठकाही सुरू हाेत्या. परंतु, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी मंगळवारी रात्री अचानकपणे चलनातील नाेटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला अाणि तेव्हापासून महापालिका निवडणुकीच्या चर्चेलाही तात्पुरता विराम मिळाला अाहे. प्रत्येक जण सध्या नाेटा अाणि त्यामुळे हाेणारे परिणाम तसेच नाेटा बदलण्यासाठी स्वत:ला अालेले अनुभव याविषयीचे कथन करताना दिसत अाहेत. त्यामुळे सध्या तरी निवडणुकीच्या विषयावर चर्वितचर्वण करण्यास काेणास फारसा रस नाही. असे असले तरी भाजपची मंडळी मात्र पंतप्रधानांनी घेतलेला निर्णय किती देशहिताचा अाहे हे साेशल मीडियावर संदेश टाकून पटवून देताना दिसत अाहे. काहींनी तर निर्णयाचे स्वागतपत्रही काढले अाहे. मात्र, या पत्रावर स्वत:चे नाव अाणि प्रभाग क्रमांक विशद करण्याचा विसर या मंडळींना पडलेला दिसत नाही.
बातम्या आणखी आहेत...