आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक : नाशिक विभाग पदवीधर मतदार संघासाठी 54 टक्के मतदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पदवीधर मतदारसंघासाठी नाशिकमधील शासकीय कन्या विद्यालय या केंद्रावर मतदारांची लागलेली रांग. - Divya Marathi
पदवीधर मतदारसंघासाठी नाशिकमधील शासकीय कन्या विद्यालय या केंद्रावर मतदारांची लागलेली रांग.
नाशिक - पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत अवघे लाख ३९ हजार ४७५ म्हणजे ५४.३८ टक्के इतकेच मतदान झाले. त्यात नंदुरबारने आघाडी घेतली. परंतु नाशिक जिल्ह्यात मतदानाचा निच्चांक नोंदविला गेला. महिलांचे प्रमाण कमीच आढळून आले. एकूण ३२ हजार ७७३ महिलांनीच मतदान केल्याने पदवीधर महिलांनीही मतदानात फारसा उत्साह दाखविला नसल्याचे चित्र दिवसभर आढळून आले. 
 
नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यात झालेल्या पदवीधर निवडणुकीत यंदाही मतदारांनी मतदानासाठी फारसा रस दाखविला नाही. सकाळी वाजेपासून मतदानास सुरुवात झाल्यानंतर दुपारी १२ पर्यंत २० ते २५ मतदारांनीच मतदान केल्याचे चित्र काही केंद्रावर दिसून येत होते. दुपारी १२ पर्यंत २२ टक्के मतदान झाले होते. दुपारी १२ ते दरम्यान मतदानात वाढ होण्यास सुरुवात झाली. ती टक्केवारी ३८ वर पोहचली. वाजेपर्यंत ५४.३८ टक्के मतदान झाले. दरम्यान, सकाळी मतदानाचे प्रमाण कमी असल्याने काही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून दूरध्वनीवरून संपर्क साधत मतदानास जाण्यासाठी आवाहन केले जात होते. मतदानाच्या दिवशीही स्वतंत्ररित्या पदवीधरांना एसमएमसद्वारे मतदान करण्याची आठवण करून दिली जात होती. कॉंग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे, भाजपकडून डॉ. प्रशांत पाटील आणि डाव्या आघाडीचे प्रा. राजू देसले यांच्यासह १७ उमेदवार या निवडणुकीत उभे आहेत. 

सोमवारी मतमोजणी : शुक्रवारी पदवीधर मतदारसंघासाठी मतदान झाल्यानंतर आता सर्वांच्या नजरा मतमोजणीकडे लागल्या आहेत. सोमवारी (दि. ६) यासाठी मतमोजणी होणार आहे. नाशिकच्या अंबड अाैद्याेगिक येथील सेंट्रल वेअरहाउस येथे सकाळपासून मतमोजणीस सुरुवात होईल. 

पुढील स्लाईडवर वाचा, विभागातील मतदानाची अाकडेेवारी अशी...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...