आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट लाईट सिस्टिमद्वारे वीजबचतीचा मार्ग... विद्यार्थ्यांचा प्रकल्प

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- रात्रीच्या वेळी महामार्ग, माेठे कारखाने, संस्था अादी ठिकाणी काेणी नसतानाही विजेचे दिवे सुरूच असतात. त्यामुळे विजेची माेठी नासाडी हाेते. ही बाब टाळण्यासाठी देवळाली कॅम्प येथील डाॅ. गुजर सुभाष हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नामी शक्कल लढविली अाहे. त्यांनी ‘स्मार्ट राेड लाईट सिस्टिम’च्या माध्यमातून ४० टक्के वीज बचतीचा मार्ग शोधला अाहे. हा प्रयाेग खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना एवढा अावडला की, त्यांनी ताे अाता केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासमाेर सादर करण्याचा शब्द शाळेला दिला अाहे.

शाळेच्या विज्ञान विभागाच्या वतीने विद्युत बचतीची ही संकल्पना शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी साकारून दाखविली अाहे. अनेक ठिकाणे वा रस्ते निर्मनुष्य असतानाही तेथील विजेची दिवे सुरू असतात. त्यामुळे विजेची मोठ्या प्रमाणावर नासाडी हाेते. ही बाब टाळण्यासाठी मनुष्य वा वाहन येण्याच्या अाधी वीजपुरवठा सुरू करण्याची प्रणाली संबंधितांनी विकसित केली अाहे. मनुष्य वा वाहन त्या ठिकाणाहून निघून गेल्यावर दिवे पुन्हा बंद होतील, अशी ही प्रणाली अाहे.

या प्रणालीसाठी सतीश शर्मा, पीयूष गवलानी, मुकेश लखन, अलक्वसा खान, अजय शर्मा, शुभम चाैहान, ज्याेती देसाई या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले. विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक ए. एस. पाटील यांनी मार्गदर्शन केले. तर, अार. अार. धाेंगडे, पी. इ. फाेकने, बी. के. घनदाट, एस. बी. घाेरपडे, अार. एस. ससाने यांचीही या प्रयाेगासाठी मदत मिळाली.

केवळ एकदाच करावा लागेल खर्च
याप्रकल्पासवास्तविक स्वरूपात अमलात अाणले तर फक्त एकदाच खर्च हाेऊन माेठ्या प्रमाणावर वीजबचत हाेणार अाहे. त्या अनुषंगाने सुरुवातीचा खर्च लवकरच भरून निघेल. - अार. अार. चावला, सेक्रेटरी,शंकर एज्युकेशन साेसायटी

शासन निश्चितच दखल घेईल
याप्रकल्पाद्वारेविज्ञान शिक्षक अाणि विद्यार्थ्यांनी जनतेसमाेर ऊर्जा बचतीचा एक चांगला सक्षम पर्याय ठेवला असून, त्याची शासन निश्चितच दखल घेईन, असा अाम्हाला विश्वास अाहे. - बी. ए. गाडीलाेहार, मुख्याध्यापक,हिंदी माध्यमिक विद्यालय ज्युनिअर काॅलेज
डाॅ. गुजर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पाची पाहणी करताना खासदार हरिश्चंद्र चव्हाण. समवेत प्रकल्पाची माहिती देताना संस्थेचे सेक्रेटरी आर. आर. चावला. दुसऱ्या छायाचित्रात प्रकल्पाची प्रतिकृती.