आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाच्या झळांबराेबरच भारनियमनाचे चटके वाढले, शनिवारी शहरात सहा तास ‘बत्ती गुल’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तपमानाचापारा ३९ वर स्थिरावल्याने अंगाची लाहीलाही हाेत असतानाच अाता उन्हाच्या चटक्याबरोबरच भारनियमनाच्या झळा सोसाव्या लागत अाहे. शनिवारी शहरातील बहुतांश ठिकाणी चक्क सहा ते अाठ तास वीजपुरवठा खंडित झाला हाेता. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. विशेषत: विद्युत माेटारी सुरू झाल्याने इमारतीतील रहिवाशांचे पाण्यासाठी माेठाच त्रास सहन करावा लागला. 
 
वाढत्या उन्हामुळे असह्य झालेल्या नागरिकांनी एसी, कूलर, पंखे, फ्रीज या विजेच्या उपकरणांचा वापर वाढविला अाहे. परिणामत: विजेच्या पुरवठ्यापेक्षा मागणी अधिक वाढून भारनियमनाच्या संकटाला शहरवासीयांना सामाेरे जावे लागत अाहे. गेल्या अाठवड्यापासून दरराेज वीजपुरवठा खंडित हाेत अाहे. तपमान वाढलेले असतानाच वीज जात असल्याने घामाळलेल्या नाशिककरांना उकाडा सहन करण्यापलीकडे पर्याय उरत नाही. शाळांना असलेल्या सुट्या अाणि त्यातच उकाडा यामुळे दुपारच्या वेळी अाबालवृद्धांना घरीच बसून रहावे लागते. दुपारच्या वेळी शहरातील सर्व रस्ते वाहनचालकांअभावी अक्षरश: अाेस पडलेले दिसतात. सायंकाळच्या वेळी वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण हाेताे. त्यामुळे नागरिक जवळपासच्या पर्यटनस्थळांवर गर्दी करताना दिसतात. साेमेश्वर, बालाजी मंदिर, फाळके स्मारक, वनउद्यान, प्रमाेद महाजन उद्यान, इतिहास संग्रहालय अादी ठिकाणांचा यात समावेश अाहे. 

वाढत्या विजेच्या मागणीने शहराचे नियाेजन काेलमडले : नाशिकजिल्ह्यात सुमारे हजार मेगावॅट विजेची मागणी अाहे. परंतु विद्युत तितका पुरवठा हाेत नसल्याने जिल्ह्यात ते तास भारनियमन सुरू करण्यात अाहे. शहरात तास भारनियमनाचे नियाेजन हाेते. प्रत्यक्षात विजेची मागणी तसेच पुरवठा यात माेठी तफावत वाढल्याने सध्या ग्रामीण भागाप्रमाणेच शहरातही सहा ते नऊ तासांपर्यंत भारनियमन सुरू अाहे. 

मिनरलवाॅटर खरेदी करण्याची वेळ : शनिवारीपंचवटी, मध्य नाशिक, गंगापूरराेड, काॅलेजराेड, सिडकाे, इंदिरानगर, सातपूर, अंबड यासह बहुसंख्य ठिकाणी वेगवेगळ्या वेळेत वीजपुरवठा बंद हाेता. सकाळच्या वेळी अनेक ठिकाणी वीज नसल्याने पाण्याच्या माेटारी बंद राहिल्या. परिणामत: वरच्या मजल्यापर्यंतही पाणी पाेहाेचले नाही. भारनियमानची पूर्वकल्पना नसल्याने नागरिकांनी अतिरिक्त पाण्याचा साठाही करून ठेवला नव्हता. त्यामुळे सकाळी नाेकरदारांसह गृहिणींचे कमालीचे हाल झाले. काही रहिवाशांनी तर चक्क मिनरल बाटल्या खरेदी करून कुटुंबीयांची तहान भागविली. 

{ उष्णतेमुळे गारवा देणाऱ्या विजेच्या उपकरणांचा वापर वाढला. 
{ विजेची मागणी अाणि उपलब्ध पुरवठा यात निर्माण झाली माेठी तफावत. 
{ कोराडी येथील संच क्रमांक ५, १०, परळीचे संच क्र. ५, चंद्रपूर संच ७, भुसावळ संच हे आठ संच बंद असल्याने राज्यात सर्वत्र भारनियमन. 
{ उत्तर महाराष्ट्रातील अाैष्णिक विद्युत प्रकल्पांतील काही संच बंद. 
बातम्या आणखी आहेत...