आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेळापत्रकाने अभियांत्रिकी परीक्षार्थीे संभ्रमात, साेशल मीडियावर प्रसिद्धिपत्रक व्हायरल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- राज्यातील दुष्काळाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अभियांत्रिकी शाखेच्या लेखी परीक्षा यंदा लवकर घेण्याचा निर्णय घेतला अाहे. अभियांत्रिकीच्या विविध विद्याशाखांच्या परीक्षा मे २०१६ पासून सुरू होणार असल्याचे वेळापत्रक विद्यापीठाने यापूर्वीच जाहीर केले होते. परंतु, दुष्काळी परिस्थितीमुळे या परीक्षा २६ एप्रिलपासून सुरू होणार असल्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असल्याचे पत्र सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. परंतु, विद्यापीठाकडून बदल झालेले वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध झाल्याने परीक्षार्थींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे परीक्षांचे सुधारित वेळापत्रक तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

परीक्षा लवकर घेण्याच्या मागणीची दखल घेत परीक्षा मंडळाच्या बैठकीत अभियांत्रिकीच्या परीक्षा मेऐवजी २६ एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात येणार असल्याचे विद्यापीठाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले. मात्र, सोमवारी सायंकाळपर्यंत अशा प्रकारचे वेळापत्रक उपलब्ध झाल्याने परीक्षार्थींमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

नियोजित वेळापत्रकाद्वारे परीक्षा घ्यावी
अभियांत्रिकीच्यापरीक्षा वेळापत्रकात ऐनवेळी बदल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने विद्यापीठाने सुरुवातीच्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. अभाविपतर्फे पुणे विद्यापीठाच्या विभागीय कार्यालयात भेट घेऊन ही मागणी करण्यात आली. वेळापत्रकात बदल करून लवकर परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकेल. तसेच, विद्यापीठाचे माैखिक प्रात्यक्षिक परीक्षांचे नियोजनही कोलमडणार असल्याचे या निवेदनात अभाविपने नमूद केले अाहे.

२६ एप्रिलपासून परीक्षा सुरू होणार?
अभियांत्रिकीची लेखी परीक्षा मेपासून सुरू होणार असल्याचे वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले होते. त्यात बदल करण्यात आला असून, आता या परीक्षा २६ एप्रिलपासूनच सुरू होणार असल्याचे प्रसिद्धिपत्रकांद्वारे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र, महाविद्यालयांना याबाबत कोणतीही माहिती तसेच संकेतस्थळावरही माहिती उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे.