आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीओ अधिकारी; अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना संधी, अवजड वाहन परवाना अट रद्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ऑटोमोबाईल आणि मॅकॅनिकल इंजिनिअर यांना आता आरटीओ अधिकारी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. पूर्वी या पदासाठी अवजड वाहन परवाना आणि एक वर्षाचा अनुभव अशी अटी होती. प्रादेशिक परिवहन विभागाने ही अट शिथिल केली आहे. उमेदवाराची निवड झाल्यानंतर अवजड वाहतूक परवाना काढण्याची मुभा देण्यात आली आहे. परिवहन आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी राज्यातील सर्व अभियांत्रिकी तंत्र निकेतन महाविद्यालयांना याची माहिती कळवले आहे. 
 
अटी शिथिल झाल्याने आरटीओ विभागाला तरुण आणि हुशार अधिकारी मिळणार आहे. ऑटाेमोबाईल आणि मॅकॅनिकल इंजिनिअरच्या विद्यार्थ्यांससाठी आरटीओ इनस्पेक्टर पदाच्या एक हजार जागा भरण्याची शासनाने घोषणा केली आहे. परिवहन विभागात सहायक मोटर वाहन निरीक्षकांची पदे ही सुरुवातीपासून केवळ मॅकॅनिकल आणि ऑटोमोबाईल अभियांत्रिकी उमेदवारांसाठी राखीव होती. या विशिष्ट अटी-शर्ती मुळे बऱ्याच अभियंत्यांना परीक्षेसाठी अर्ज करणे शक्य नव्हते. सहायक आरटीओ अधिकारी पदासाठी राज्य लोकसेवा आयोग लवकरच परिक्षा घेणार आहे. यापदासाठी आता अभियांत्रिकी तंत्रनिकेतन इंजिनिअरिंगचा डिप्लोमा अथवा पदवी धारकांसह डीएमइ, डीएइ, बीई, बीटेच, मॅकॅनिकल, ऑटोमोबाईलच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही संधी मिळणार आहे. पूर्वी या परीक्षेसाठी अवजड वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक होता तसेच विशिष्ट वर्कशॉपमध्ये एक वर्ष अवजड वाहन दुरुस्ती करण्याचा अनुभव आवश्यक होता. 

ही अट शिथिल करण्यात आली असून, हा परवाना काढण्यासाठी आणि अनुभव घेण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र, परिक्षा देण्यासाठी हलके मोटर वाहन परवाना आवश्यक आहे. त्यामुळे ही परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना हलके वाहन परवाना काढणे अनिवार्य राहणार आहे. परिवहन विभागात सहायक मोटर वाहन निरीक्षक, मोटार वाहन निरीक्षक पदाची हजार पदे निर्माण करण्यात आली आहे. ही पदे टप्प्या टप्प्याने भरण्यात येणार असल्याची माहिती परिवहन आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी प्रसिद्धी पत्राकाद्वारे दिली आहे. त्यामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यंंचा चांगली संधी असल्याने त्यांना या पदासाठी अर्ज करण्याचा मार्ग माेकळा झाला अाहे. 
बातम्या आणखी आहेत...