आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरजातीय विवाह केल्यास २.५ लाख अनुदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन या स्वायत्त संस्थेच्या वतीने आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांसाठी प्रायाेगिक तत्त्वावर नवी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह केलेल्या दांपत्यास २ लाख ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.
एक एप्रिल २०१५ पासून पुन्हा या योजनेची पुनर्मूल्यांकन योजना पुढे सुरू ठेवण्याचा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाने निर्णय घेतला आहे. नवविवाहितांपैकी एक जण अनुसूचित जाती व एक जण अनुसूचित जाती सोडून इतर प्रवर्गातील असलेल्या नवदांपत्यास या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे. हिंदू विवाह कायदा १९५५ अंतर्गत नोंदणीकृत विवाह केलेल्या दांपत्यासच फक्त योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे. दांपत्यापैकी जर एकाचा दुसरा विवाह असेल, तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
दांपत्याने आंतरजातीय विवाह केल्यापासून एका वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे. दांपत्याचे दोघांचे मिळून ५ लाखांपर्यंत उत्पन्न असण्याची अट अाहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह केलेल्या प्रत्येकी एका दांपत्यास २ लाख ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. या रकमेपैकी ५० टक्के रक्कम डिमांड ड्राफ्टद्वारे प्रदान केली जाणार आहे, तर ५० टक्के रक्कम दांपत्याच्या संयुक्त खात्यात ५ वर्षांसाठी फिक्स्ड डिपॉझिट म्हणून ठेवली जाणार आहे.