आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरकोळ घटना वगळता नाशकात शांततेत मतदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक  -किरकाेळ घटना वगळता नाशिक महापालिका व जिल्हा परिषदेची मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यात निवडणूक अायाेग व पोलिस  यंत्रणेला यश आले. मंगळवारी महापालिकेसाठी सरासरी ६० टक्के तर जिल्हा परिषदेसाठी ६८ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज निवडणूक अायाेगाने वर्तवला अाहे.  
 
संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर  अतिरिक्त बंदोबस्त तैनात  असल्याने म्हसरूळ येथील अपवाद वगळता शहरात सर्वच प्रभागात मतदान शांततेत पार पडले. मात्र पोलिस प्रशासनाची खरी कसोटी मतमोजणी आणि निकालानंतर होणाऱ्या वादावादीच्या  घटना रोखण्यासाठी लागणार आहे. 
 
या निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे अनेक उमेदवार व त्यांचे वारसदार निवडणूक रिंगणात  असल्याने निकालानंतर प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये वादाची ठिणगी पडण्याची भीती व्यक्त हाेत अाहे.
 
 सातपूर विभागातील शिवाजीनगर येथील मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी कमी करण्यासाठी  पाेलिसांनी साैम्य लाठीमार केला, तर सातपूरमध्ये मतदारांच्या वाहनांची हवा साेडण्याचे छायाचित्र काढणाऱ्या पत्रकारास पाेलिसांनी एखाद्या अाराेपीप्रमाणे ताब्यात घेऊन एका वाहनात बसवून फिरवले.
 
 प्राथमिक सुविधा देण्याकडेही दुर्लक्ष करणारे प्रशासन व लाेकप्रतिनिधींच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यातील गरबड (ता. मालेगाव) येथील मतदारांनी मंगळवारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकल हाेता. गेल्या पाच वर्षात गावात विकासकामे झाली नसल्याचा या गावकऱ्यांचा अाराेप अाहे.
बातम्या आणखी आहेत...