आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: विहिरीत गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सटाणा  (जि. नाशिक) - घरात किंवा शेतातील झाडाला गळफास घेऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी महाराष्ट्र चिंताग्रस्त असताना बागलाण तालुक्यातील जोरणच्या  युवा शेतकऱ्याने कर्जबारीपणाला कंटाळून विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, विहिरीच्या मध्यभागी असलेल्या मोटारीच्या फाउंडेशनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने पोलिसांसह शासकीय अधिकारी आणि ग्रामस्थही चक्रावले आहेत. नितीन जगन्नाथ बेडीस (वय २३) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
 
नितीन हा बुधवारी रात्री कुटुंबीयासह शेतातील घरात झोपला होता. मात्र, सकाळी तो घरात न दिसल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. मात्र, पाच तास शोध घेऊनही तो सापडला नाही. अखेर शेजारच्या शेतकऱ्याने विहिरीत डोकावून पाहिले असता नितीन विहिरीतील मोटारीच्या फाउंडेशनला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. आत्महत्येची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरताच किकवारीचे पोलिस पाटील विश्वास देवरे यांनी सटाणा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बशीर शेख यांना आत्महत्येची माहिती दिली. शेख यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने मृत नितीनचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. दरम्यान, नितीनच्या आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
 
साडेतीन लाखांचे कर्ज : मृत नितीनवर कुटुंबाची जबाबदारी होती. बेडीस कुटुंबीयांवर साडेतीन लाखांचे कर्ज होते या कर्जापोटी त्याने  आत्महत्या केली. 
बातम्या आणखी आहेत...