आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक : जिल्हा बँकेला तातडीने अार्थिक मदतीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गेल्या तीन महिन्यांपासून अार्थिक ठणठणाटाने अडचणीत अालेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला साेमवारी दिलासा मिळाला. जिल्हा बँकेचे सभासद, शेतकरी अाणि ठेवीदारांचे हित लक्षात घेऊन राज्य बँकेने शक्य असेल त्या मार्गाने तातडीने अार्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकारमंत्र्यांना देत, राज्य बँकेच्या सचिवांना त्याबाबत सूचना करण्याचे सहकारमंत्र्यांना सांगितले. यामुळे मुख्यमंत्र्यांची ही बहुप्रतीक्षित चर्चा फळाला अाली असली, तरी अाता राज्य बँक प्रत्यक्षात किती मदत करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार अाहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत तळ ठाेकून बसलेल्या 
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, संचालक गणपत पाटील, शिरीषकुमार काेतवाल, परवेझ काेकणी यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने साेमवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासाेबत झालेल्या चर्चेत हे आदेश मुख्यमंत्र्यांनी सहकारमंत्र्यांना दिल्या अाहेत. शेतकरी अाणि ठेवीदारांचे हित जपण्यासाठी, जसे शक्य असेल तशी तातडीची मदत जिल्हा बँकेला उपलब्ध करून द्या, जेणेकरून बँकेची चलनकाेंडी फुटेल व्यवहार सुरळीत हाेऊ शकतील, शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध हाेऊ शकेल अाणि वसुलीही सुरू राहील, असे आदेश दिले. यावेळी अामदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे अादी उपस्थित हाेते. 
 
प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्यांनाही लाभ द्या : सरकारकर्जमाफी करणारच असेल तर जे शेतकरी नियमितपणे कर्जभरणा करतात त्यांनाही लाभ दिला पाहिजे, अशी मागणी जिल्हा बँकेच्या संचालकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. कर्जमाफीच्या चर्चेमुळे यावर्षी हे नियमित कर्ज भरणारेही अनेक शेतकरी कर्ज भरायला पुढे अालेले नाहीत, असा निर्णय सरकारने घेतला तर थकीत कर्ज वसूल हाेऊ शकेल याकडे संचालकांनी लक्ष वेधल्याचे मुख्यमंत्र्यांनीही ते सकारात्मकपणे घेतल्याची माहिती शिरीषकुमार काेतवाल यांनी दिली. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी खंबीरपणे बँकेची बाजू अन‌् शेतकऱ्यांचे हित मुख्यमंत्र्यांकडे मांडल्याचेही काेतवाल यांनी स्पष्ट केले. 

तरच येणार सुस्थिती : बँकसुस्थितीत अाणायची असेल तर केवळ या मदतीमुळे विशेष फरक पडणार नाही तर ज्या शेतकऱ्यांकडे बँकेची थकबाकी अाहे, त्यांनी ती भरली पाहिजे, ज्यातून बकेला कर्ज वितरण अाणि दैनंदिन व्यवहारांसाठी चलन उपलब्ध हाेऊ शकेल. सरकारनेही कर्जमाफी करणार की नाही याबाबत काय ते स्पष्ट केले पाहिजे. 
 
नक्की किती मदत मिळते हे पहाणे महत्त्वाचे 
जिल्हाबँकेने राज्य बँकेकडे असलेल्या जवळपास ७०० काेटींच्या ठेवींपाेटी १७० काेटींचा अाेव्हरड्राफ्ट मिळावा, अशी मागणी केली अाहे. त्यातच मागील वर्षीच्या पिककर्ज पुनर्गठनाचे ४० काेटी राज्य बँकेकडून जिल्हा बँकेला घेणे अाहे, या दाेन्ही बाबी बँकेच्या संचालकांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास अाणून दिल्या अाहेत, त्यामुळे अाता राज्य बक नक्की किती मदत करते, हे पाहणे अाता महत्त्वाचे ठरणार अाहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...