आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅरीच्या पाेलिस काेठडीत वाढ, आणखी गुन्हे हाेणार दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तोतया दिग्दर्शक हॅरी सपकाळेच्या विरोधात तक्रारदारांची संख्या वाढतच असून, त्याच्याविरोधात फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शनिवारी (दि. २४) चार दिवसांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने हॅरीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने हॅरीच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ केली. 
 
सॅप मॉडेलिंग कंपनीचा तोतया दिग्दर्शक हॅरी सपकाळे याच्याविरोधात तक्रारदारांची संख्या वाढत असून, शनिवारी आणखी चार तक्रारदारांनी पोलिसांत धाव घेतली. या तक्रारदारांना चित्रपट, मालिका आणि जाहिरातीमध्ये काम देण्याचे अामिष देत लाखोंची फसवणूक केल्याची तक्रार युवतींसह त्यांच्या पालकांनी दिली. हॅरीने विविध शोच्या माध्यमातून बड्या व्यावसायिकांकडून प्रायोजकत्व घेत त्यांची फसवणूक केली. शोमध्ये इव्हेंट, कोरिओग्राफर, मेकअप, आर्टिस्ट यांनाही मोठ्या चित्रपटकंपनीमध्ये काम मिळवून देण्याचे अामिष देत फसवणूक केली आहे. घरकाम करणाऱ्या महिलांना सिनेअभिनेता रितेश देशमुखच्या मुंबई येथील घरी घरकाम मिळवून देण्याचे अामिष देत त्यांच्याकडून २५ हजार रुपये उकळल्याचा तपास निष्पन्न झाले. अशाच प्रकार फसवणूक झालेल्या चार तक्रारदारांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. हॅरीने फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून युवतींना प्रलोभन देत त्यांची फसवणूक केली आहे. त्याच्या विरोधात आयटी अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. हॅरीच्या विरोधात फसवणुकीच्या ३० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीनुसार सुमारे ३० लाखांची फसवणूक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयिताच्या विरोधात ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या युवतीच्या तक्रारीनुसार इंदिरानगर पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात हॅरीच्या अटक करणे बाकी अाहे. ्यायालयाने आणखी चार दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

छळ केल्याच्याही तक्रारी 
^हॅरीच्या विरोधात तक्रारदारांची संख्या वाढत आहे. फसवणुकीचा आणि छळ केल्याच्या तक्रारी आहेत. तक्रारींच्या अाधारे त्याच्याविरोधात लवकरच आणखी एक गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. -डॉ.राजू भुजबळ, सहायक आयुक्त, विभाग 
 
बातम्या आणखी आहेत...