आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

75 लाखांच्या निधीसाठी अखेर जुन्या दाेनशे काेटींच्या कामांवर फुली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- भाजप सत्ताकाळात नगरसेवकांना ७५ लाख रुपयांचा नगरसेवक निधी देण्याचा शब्द पाळण्यासाठी अखेर महापाैर रंजना भानसी यांनी मागील पाच वर्षांत प्रशासकीय मंजुरी नसलेली तसेच अद्याप सुरू झालेल्या दाेनशे काेटी रुपयांच्या कामांवर फुली मारली अाहे. संबंधित कामे वगळल्यामुळे महापालिकेचे दायित्व अर्थातच स्पिल अाेव्हर अाता तीनशे काेटींपर्यंत येणार असल्यामुळे अायुक्त अभिषेक कृष्णा हेदेखील वाढीव निधीसाठी राजी झाले अाहेत. 

महापालिकेची अार्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे ७५ लाख रुपयांचा नगरसेवक निधी यंदा देता येणार नाही, असे अायुक्तांनी स्पष्ट केले हाेते. मात्र, तत्पूर्वीच महापाैरांनी नाशिककरांनी भाजपला दिलेले बहुमत, ६६ नगरसेवकांमुळे पक्षाबाबत वाढलेल्या अपेक्षा, निधीअभावी नगरसेवकांची रखडणारी कामे बघता यंदा ७५ लाख रुपयांचाच निधी देण्याची भूमिका घेतली हाेती. महापाैराची भूमिका अार्थिक ताळेबंदाला मारक असल्यामुळे अायुक्तांनी ४० लाख रुपयेच दिले जातील, असा पवित्रा घेतला. या मुद्यावरून महापाैर विरुद्ध अायुक्त असे शीतयुद्ध सुरू झाल्यानंतर सुवर्णमध्य कसा निघणार असा प्रश्न उपस्थित झाला. 

महापालिकेवर जवळपास सहाशे काेटी रुपयांचे जुन्या कामांवरील बंधनात्मक दायित्व असून ते कमी करता अाले तर उपलब्ध निधी नगरसेवकांना देता येईल असा मार्ग पुढे अाला. त्यातून यापूर्वी महासभेत मंजूर झालेली मात्र अद्याप सुरू झालेली, त्याचप्रमाणे प्रशासकीय मंजुरी नाही, निविदा नाही, कार्यारंभ अादेश नाही या सदरात माेडणारी इ-श्रेणीतील कामांवर फुली मारण्यात अाली अाहे. जवळपास दाेनशे काेटी रुपयांची जुनी कामे रद्द झाल्यामुळे महापालिकेच्या खांद्यावर अाता नवीन कामे सुचवून त्याचे दायित्व येणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...