आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फलित विकास आराखड्याचे, \'फ्यूचर सिटी\' साकारण्याची संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- देशात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा अग्रक्रमाने समावेश झाल्यानंतर आता शहर विकास आरखड्यातील नावीन्यपूर्ण संकल्पनांमुळे शहराची निकोप वाढ होण्यास चालना मिळू शकणार आहे. शहरालगतच्या खेड्यांमध्ये वेगाने नागरीकरण होत असल्याचे लक्षात घेऊन नवीन विकास आराखड्यात जुनी आरक्षणे रद्द करून भविष्याच्या दृष्टीने फ्यूचर सिटी साकारण्यास अनुकूल दिशा देण्यात आली आहे. पाथर्डी मखमलाबाद या दोन गावांतील औद्योगिक वसाहतीसह इतर आरक्षणांनी बाधित असलेल्या ४०० हून अधिक हेक्टर जागेवर आता फ्यूचर सिटी साकारण्याची संधी निर्माण होणार आहे.
नाशिक शहरालगतच्या पाथर्डी मखमलाबाद या दोन खेड्यांमधील ४४२ हेक्टरवर शहर विकास आराखड्यात "भविष्यकालीन शहरीकरण क्षेत्र' प्रस्तावित करण्यात आले आहे. पाथर्डी गाव परिसरात वेगाने शहरीकरण होत असून, मोठे गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहेत. त्यात कम्युनिटी हाउसिंगचे प्रकल्प असल्याने विकसकांना पायाभूत सुविधा पुरविणे शक्य होत आहे.
जुन्या विकास आराखड्यात पाथर्डीत २५० हून अधिक हेक्टरवर आैद्योगिक वसाहतीसह इतर सार्वजनिक वापरांची आरक्षणे टाकण्यात आली होती. आता या आराखड्यात भविष्यकालीन शहरीकरण असे प्रस्तावित असल्याने नवीन शहर वसविण्याची संकल्पना त्यामागे असून, त्यासाठी रस्त्यांचे नियोजनही करण्यात आले आहे. मखमलाबादमध्येही शहरीकरणाचा वेग इतर खेड्यांच्या तुलनेत जास्त असल्याने येथेही भविष्यात वेगाने विकास करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
अशी साकारू शकेल फ्यूचर सिटी
- शेतकरी विकसक एकत्र येऊन २० हेक्टर ते ५० हेक्टर क्षेत्रावर साकारू शकतील कम्युनिटी प्रोजेक्ट
- रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज या सुविधा पुरविणे होईल सहज शक्य
- शेतकऱ्यांना मिळू शकेल जास्त फायदा तर विकसकांना बांधकामांकरिता मिळू शकेल अधिक जागा
या पूरक बाबी
मुंबई-आग्रा महामार्ग, मुकणे धरणातून प्रस्तावित थेट जलवाहिनी, खत प्रकल्प जवळच असलेली आैद्योगिक वसाहत या पूरक सुविधांमुळे पाथर्डीच्या विकासाला वेग आला आहे. महामार्गापासून वालदेवीनदीपर्यंत २५० हून अधिक हेक्टर क्षेत्रावरील औद्योगिक वसाहतीची आरक्षणे नवीन आराखड्यात रद्द करण्यात आली असून, तेथे भविष्यातील सुनियोजित पद्धतीने शहर वसविण्याचे प्रस्तावित आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास या क्षेत्रात विकसकांना मोठे प्रकल्प साकारता येणार आहे.
मोठे प्रकल्प साकारतील
- शहरालगत असलेल्या गावांचा विचार करता पाथर्डी गावात वेगाने विकास होत असून भविष्यात या भागात मोठे गृहनिर्माण प्रकल्प साकारण्याला चालना मिळेल. नवीन विकास आराखड्यातील तरतुदींमुळे या भागात विकसकांना जमिनी उपलब्ध होणार असल्याने त्याचा फायदाही होऊन सर्वांसाठी चांगली घरे तयार होऊ शकतील.
बाळकृष्ण डेमसे, बांधकाम व्यावसायिक
शेतकऱ्यांनाही फायदा
- शहरालगतच्या खेड्यांमध्ये अल्पभूधारक शेतकरी असल्याने त्याविरोधात आंदोलन केल्यानंतर आराखडा रद्द झाला. नवीन विकास आराखड्यात बहुतांश आरक्षणे रद्द करण्यात आली आहेत. तसेच भविष्यात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जमीन विकसित केल्यास त्याचा फायदा शेतकरी विकसकांना होऊ शकेल.
सोमनाथ बोराडे, शेतकरी
पुढील स्लाइडवर वाचा, तज्ज्ञ काय म्हणतात?...
बातम्या आणखी आहेत...