आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीजेवाले नानांचा अटकपूर्व न्यायालयाने फेटाळला; काेणत्याही क्षणी हाेणार अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवित न्यायालयाच्या ध्वनिप्रदूषण मनाई अादेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाेलिसांनी दाखल गुन्ह्यात दंडे हनुमान मित्रमंडळाचे संस्थापक तथा राष्ट्रवादीचे नगरसेवक गजानन शेलार यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीन अर्ज साेमवारी (दि. ११) जिल्हा न्यायालयाने फेटाळला. विशेष म्हणजे, शेलार यांनी उच्च न्यायालयात जाण्यासाठी तात्पुरता अटकपूर्व मिळावा यासाठी दाखल अर्जही न्यायालयाने नामंजूर केल्याने त्यांच्या अटकेची शक्यता वाढली अाहे. 
 
गणेशाेत्सव असाे की धार्मिक सण, उत्सवात वाज वाजविताना ध्वनिप्रदूषण हाेणार नाही, यासाठी ध्वनिमर्यादा उच्च न्यायालयाने निश्चित करून दिली अाहे. या अादेशाची अंमलबजावणी पाेलिसांकडून केली जात असताना गणेशाेत्सव मिरवणुकीत डीजे वाजवून थेट पाेलिस न्यायालय दंडे हनुमान मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उघडपणे अाव्हानच दिले हाेते. याप्रकरणी पाेलिसांनी सरकारवाडा भद्रकालीत गजानन शेलार अध्यक्ष राहुल ऊर्फ बबलू शेलार याच्यासह साथीदारांविरुद्ध सप्टेंबर राेजी गुन्हा दाखल करण्यात अाला. या गुन्ह्यात गजानन शेलार यांनीही अटकेची शक्यता बघून न्यायालयात अटकपूर्वसाठी धाव घेतली. सुरुवातीला तीन दिवसांचा तात्पुरता अटकपूर्व मंजूर केला. दरम्यान, शनिवारी भद्रकाली पाेलिसांनी शेलार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना चाैकशीसाठी पाेलिस ठाण्यात साेबत अाणले. तीन तासांच्या चाैकशीनंतर तात्पुरत्या जामीन मंजुरीची प्रत दाखविताच सुटका करण्यात अाली. या पार्श्वभूमीवर साेमवारी (दि. ११) जिल्हा सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्यासमाेर अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली. 
 
सरकारी कर्मचाऱ्यांनाच मारहाणीचे गुन्हे 
न्यायालयात सरकारी वकील अजय मिसर यांनी बाजू मांडताना नगरसेवक शेलार यांच्याविरुद्ध यापूर्वी चार गुन्हे दाखल असून, त्यात दाेन-तीन गुन्हे हे पाेलिस अाणि सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाणीचेच अाहेत. पाेलिस कर्मचाऱ्याच्या खुनाच्या गुन्ह्यातही शेलार यांच्यावर अाराेप हाेता. उच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषण राेखण्यासाठी अादेश दिले असताना त्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेलाच त्यांनी अाव्हान दिले अाहे. कायद्याचा धाकच नसल्याने त्यांचा अटकपूर्व फेटाळावा, अशी मागणी मिसर यांनी केली. तर शेलार यांच्या वतीने अॅड. राहुल कासलीवाल यांनी पाेलिस कर्मचारी खून वगैरे प्रकरणे २० ते २२ वर्षांपूर्वीचे असून त्यात निर्दाेष मुक्तता झाली अाहे. त्या गुन्ह्यांचा याच्याशी काही संबंध नसून पाेलिस केवळ व्यक्तिगत पातळीवर जाऊन त्यांना गुन्ह्यात अडकवित अाहेत. या गुन्ह्यातील उर्वरित संशयितांना जामीन मिळाला असून डीजे अाणि ट्रकदेखील जप्त असल्याने त्यांच्या अटकेची अावश्यकता नसल्याचा युक्तिवाद केला. तर मिसर यांनी पुन्हा शेलार यांना भद्रकाली पाेलिसांपाठाेपाठ सरकारवाड्याच्या हद्दीत मिरवणूक गेल्यावरही ध्वनिमर्यादा ठेवण्याबाबत सूचना करूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने दाेन गुन्हे दाखल करण्यात अाले. यावर न्यायालयाने शेलार यांचा अटकपूर्व जामीन फेटाळताना कायद्याचा धाक प्रत्येकाला असलाच पाहिजे, अशी टिप्पणी न्या. शिंदे यांनी केली. 
 
पाेलिस पथकाद्वारे शाेध सुरू 
न्यायालय अाणि पाेलिसांना अाव्हान देणाऱ्या शेलार यांचा अटकपूर्व न्यायालयाने फेटाळला असून, त्यांना उच्च न्यायालयात जाण्यासाठी तात्पुरता अटकपूर्वचा अर्जदेखील फेटाळला. त्यामुळे शेलार यांना काेणत्याही क्षणी अटक हाेऊ शकते. त्यांच्या शाेधासाठी घराची झडती घेण्यात अाली असून, वेगवेगळ्या पथकांद्वारे त्यांचा शाेध घेतला जात अाहे. 
- लक्ष्मीकांत पाटील, उपअायुक्त 
 
बातम्या आणखी आहेत...