आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा शाडू मातीच्या गणेशमूर्तींची उपलब्धता अधिक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- प्लॅस्टरऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विसर्जनाने पर्यावरणावर गंभीर परिणाम हाेत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर आता पर्यावरण संवर्धनासाठी मूर्तिकार अाणि गणपती मूर्ती विक्रेते सरसावले अाहेत. यंदापासून शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याकडे मूर्तिकारांनी कल दर्शविला आहे. दुसरीकडे अनेक विक्रेत्यांनीही प्लॅस्टर ऑफ पॅरिसवर फुली मारून शाडूच्या मूर्तींची विक्री करण्याची भूमिका घेतली आहे. परिणामत: गेल्या वर्षाच्या तुलनेने यंदा अधिक प्रमाणात शाडू मातीच्या मूर्ती उपलब्ध होणार आहेत.
पुढील महिन्यात लाडक्या गणरायाचे आगमन होणार असून, गणरायाच्या स्वागतासाठी नाशिकमध्ये जोरदार तयारी सुरू झाली आहे. मूर्तिकारांनी आता आपल्या मूर्तींवर अंतिम हात फिरवणे सुरू केले असून, विविध मनमोहक मूर्तींचे दर्शन होऊ लागले आहे. यंदाच्या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या प्रमाणात शाडू मातीच्या सुबक मूर्ती भाविकांना उपलब्ध होणार आहेत. गेल्या वर्षापर्यंत ज्यांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनविण्यासाठी आणि विक्री करण्यासाठी प्राधान्य दिले होते, त्यांनी यंदा शाडू मातीच्या मूर्ती बनवण्याकडे लक्ष केंद्रित करणे सुरू केले आहे.

मूर्तींची संख्या वाढविली
आम्हीपूर्वीपासून शाडू मातीच्याच मूर्ती बनवतो. गेल्या वर्षापासून शाडू मातीच्या मूर्तीला वाढलेली मागणी लक्षात घेता यंदा आम्ही संख्या वाढवली आहे. -शांताराम मोरे, मूर्तिकार
पर्यावरणासाठी शाडूला प्राधान्य
गेल्यावर्षपर्यंत मी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विकत होतो. पर्यावरणाच्या दृष्टीने आणि धर्मशास्त्राप्रमाणे योग्य असलेल्या शाडू मातीच्या मूर्तींची यंदा विक्री करणार आहे. या सर्व मूर्ती तयार आहेत. योगेशटिळे, मूर्तिकार

शाडूची मूर्तीही सुबक
पूर्वीशाडू मातीच्या मूर्ती एकाच धाटणीच्या दिसायच्या. तिच्यात फारशी सुबकता नसायची. आता मात्र शाडू मातीच्या मूर्तीही सुबक बनवता येतात. इको फ्रेंडली रंगांचा वापर करून ही मूर्ती आबालवृद्धांना आकर्षित करते. यंदा मी स्वत: शाडूच्या मूर्ती बनविण्यावर भर दिला अाहे. योगेशपाळदे, मूर्तिकार