आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परवानगीअाधीच विक्रेत्यांनी उभारले मूर्ती विक्रीचे गाळे, महापालिकेच्या लिलावालाही दिला फाटा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गणेशमूर्ती विक्रीच्या गाळे उभारणीवरून नवा वाद सुरू झाला असून महापालिका अायुक्त पाेलिसांच्या परवानगीविनाच काही मंडळींनी गाेल्फ क्लब मैदानावर गाळे उभारणीस सुरुवात केली अाहे. विशेष म्हणजे, या गाळ्यांसाठी लिलाव हाेणेही बाकी असताना राजकीय दबाव टाकत सर्रास गाळे उभारणी हाेत अाहे. 
 
त्र्यंबक राेडवर जिल्हा रुग्णालयाबाहेर गाळे उभारण्यावरून मूर्ती विक्रेते अाणि महापालिका प्रशासन यांच्यात दरवर्षी वाद हाेताे. रुग्णालयामुळे हे शांतता क्षेत्र असल्याने परिसरात गाळे उभारण्यास मज्जाव करण्यात येत हाेता. गेल्या वर्षाप्रमाणे यंदा गाेल्फ क्लब मैदानावर गाळे उभारण्यात येणार अाहेत. मात्र, प्रत्यक्षात महापालिकेच्या अायुक्तांनी अद्याप त्याबाबत काहीही निर्णय घेतलेला नाही. केवळ स्थायी समितीच्या एका ठरावावरून संबंधितांनी गाळे उभारणीस सुरुवातही केली अाहे. वास्तविक, नियमाप्रमाणे महापालिकेने स्वत: गाळे उभारून त्याचा लिलाव करणे अपेक्षित अाहे. महत्त्वाचे म्हणजे, या गाळ्यांसाठी पाेलिसांचाही ना हरकत दाखला अद्याप मिळालेला नाही. अशातच विक्रेत्यांनी परस्पर गाळे उभारल्यामुळे वाद निर्माण झाला अाहे. 

... तर गरजूंना लाभ अन‌् पालिकेलाही उत्पन्न : दरवर्षीया गाळ्यांच्या अर्थकारणाची माेठी चर्चा असते. त्यातून महापालिकेचे उत्पन्न तर बुडतेच, शिवाय सामान्य विक्रेत्यांकडून माेठे भाडेही अाकारले जाते. महापालिकेने स्वत: मंडप उभारून गाळे उभारले तर अधिक महसूल मिळू शकेल. त्यासाठी महापालिकेने लवकरात लवकर गाळे उभारून लिलाव पद्धतीने प्रतिदिन भाडे अाकारणी करणे गरजेचे अाहे. सद्यस्थितीत महापालिका केवळ जागा देते. काही राजकारण्यांशी संबंधितांकडून जागा भाड्याने घेऊन मग त्यावर गाळे उभारले जातात. या गाळ्यांच्या हिशेबानुसार महापालिकेला भाडे वेगळे भरले जाते प्रत्यक्षात, विक्रेत्याकडून भाडे त्यापेक्षाही अधिक घेतले जाते. त्यासाठी ही मंडळी अापल्याच शागीर्दाच्या नावाने गाळे घेऊन त्यानंतर पाेटभाड्याने देत धंदा करतात. 
 
मंडप मालकाविराेधात हाेणार गुन्हे दाखल 
गाळेविक्रेत्यांनी महापालिकेकडून परवानगी घेतलेली नाही. अतिक्रमण विभागास पत्र देऊन सर्व गाळे हटविले जातील. तसेच, मंडप मालकाविराेधात गुन्हेही दाखल हाेतील. 
- राेहिदास दाेरपुळकर, उपायुक्त, कर संकलन 
 
बातम्या आणखी आहेत...