आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्गणीसाठी सक्ती केल्यास मंडळांवर खंडणीचे गुन्हे, पोलिस प्रशासन सतर्क

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गणेशाेत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांकडून वर्गणीसाठी सक्ती केल्यास अशा पदाधिकाऱ्यांवर थेट खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. वर्गणीसाठी सक्ती होत असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

गणेशाेत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. त्यामुळे परिसरात मंडळांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांकडून मंडळांना आर्थिक रसद पुरवली जाणार असल्याने या मंडळांमार्फत आपले मत पक्के करण्याचा प्रयत्न नेत्यांकडून सुरू आहे. प्रत्येक गल्लीत एक मंडळ स्थापन होण्याची शक्यता असल्याने मंडळांकडून वर्गणीसाठी सक्ती केली जाण्याची शक्यता वाढली आहे. अशा मंडळांवर पोलिसांचे लक्ष राहाणार आहे. मंडळांकडून व्यावसायिक, दुकानदार, सामान्य नागरिक, वाहनधारक, हॉटेल आणि बांधकाम व्यावसायिकांकडून वर्गणी मागितली जाते. ठरलेली वर्गणी देण्यास नकार दिल्यास मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून दमदाटी करत वर्गणीसाठी सक्ती केली जाते. या मंडळांविरोधात खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. वर्गणीसाठी सक्ती होत असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. मंडळांची पोलिसांत नोंदणी करणे बंधनकारक राहणार आहे.

सक्ती केल्यास साधा पाेलिसांशी सपर्क
शहरात गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळांकडून वर्गणीसाठी सक्ती केली जाते. या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मंडळाची नोंदणी करणे बंधनकारक राहणार आहे. वर्गणीसाठी सक्ती होत असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. या मंडळांवर खंडणीचे गुन्हे दाखल होणार आहे. -श्रीकांत धिवरे, उपआयुक्त (गुन्हे)
बातम्या आणखी आहेत...