आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगापूरमध्ये १३० द. ल. घनफूट वाढीव पाणी, ..तरच धरणातून अापत्कालीन उपसा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- दारणा धरणात सिन्नर, एकलहरा, चेहडी नाशिक तालुक्यातील गावांनाच पुरवण्यासाठी पाणी कमी असल्याचे पाहून महापालिकेने तेथील जवळपास १३० दशलक्ष घनफुटांचे शिल्लक अारक्षण उचलणे बंद केले अाहे. हे अारक्षण गंगापूर धरणात स्थलांतरित करून तेथून वाढीव पाणी उपलब्ध करून देण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी तत्त्वत: मान्यता दिल्याचे पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे अाहे. वाढीव पाणी असले तरी, १५ जुलैपर्यंत चिंतेचे कारण नाही; मात्र त्यानंतर पावसाने अाेढ दिली तर मात्र तळाकडील पाणी उचलण्यासाठी महापालिकेला यंत्रणा राबवावी लागणार अाहे.

मराठवाड्याला पाणी साेडल्यामुळे यंदा प्रथमच नाशिकला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत अाहे. शहराच्या इतिहासात प्रथमच पाणीकपात जारी करावी लागली. दुष्काळी परिस्थिती, उन्हाची दाहकता, बाष्पीभवनाचा वाढता वेग यामुळे दिवसेंदिवस गंगापूर धरण तळ गाठत अाहे. महापालिकेसाठी वर्षाकरिता ३३०० दशलक्ष घनफूट पाणी अारक्षित करण्यात अाले हाेते. त्यात गंगापूर धरणातून तीन हजार, तर दारणा धरणातून ३०० दशलक्ष घनफूट पाण्याचा समावेश अाहे. अर्थात, दारणातून महापालिकेने ३०० दशलक्ष घनफूट पाणी गृहित धरले असले तरी, प्रत्यक्षात प्रशासनाने ५०० दशलक्ष घनफूट पाणी अारक्षित केले हाेते; मात्र अाजवरचा अनुभव किंबहुना सद्यस्थितीत जेमतेम १७० दशलक्ष घनफूट पाणीच महापालिकेला उचलता अालेले अाहे. परिणामी, ३१ जुलैपर्यंत दारणातील पाण्याच्या भरवशावर नियाेजन करणाऱ्या महापालिकेला अाता १३० दशलक्ष घनफुटाची तूट काेठून भरायची, असा प्रश्न हाेता. दुसरीकडे, गंगापूर धरणात सद्यस्थितीत जवळपास १२०० दशलक्ष घनफूट पाणी असून येथून महापालिकेला नियाेजित पाणी अारक्षणानुसार वापर झाल्यानंतर शिल्लक साठा ४७५ दशलक्ष घनफूट इतका अाहे. त्यामुळे हे पाणी जाता जवळपास साडेसातशे दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक राहाणार असल्यामुळे दारणातील १३० दशलक्ष घनफूट पाण्याची तूट गंगापूरमधून भरून देण्याची मागणी महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. पाण्याची तूट भरून निघाली नाही तर पुन्हा शहरात राजकीय पक्षांना अांदाेलनासाठी अायतेच निमित्त मिळेल ही बाब हेरून िजल्हाधिकाऱ्यांनी तत्त्वत: मान्यता दिल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहेे.

गंगापूर धरणात १२०० दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक अाहे. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पाऊस झाला नाही तर महापालिका त्यातील ६०० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर करेल. याव्यतिरिक्त एकलहरा अन्य काेणाचे पाणी अारक्षण वापरले गेले तर मात्र पाणी गंगापूर धरणाच्या तळाला जाईल. अशा परिस्थितीत महापालिकेच्या जॅकवेलपर्यंत पाणी अाणण्यासाठी चर खाेदून तात्पुरती उपसा यंत्रणा कार्यान्वित करावी लागेल. सद्यस्थितीत महापालिकेने तात्पुरती पाणी उचलण्याची तजवीज केली असून, कामासाठी ठेकेदारांची निवडही केली अाहे. गरज भासल्यास तत्काळ कार्यारंभ अादेश देऊन काम केले जाईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...