Home »Maharashtra »North Maharashtra »Nashik» News About Gangapur Dam Backwater

मृत्यूचे द्वार.. तरी मुक्त संचार, दाेघा तरुणांच्या मृत्यूनंतरही धरण सुरक्षितता ‘रामभराेसे’

दिव्य मराठी वेब टिम | Apr 21, 2017, 08:53 AM IST

  • सीसीटीव्हीच्या साक्षीने गंगापूर धरणावर तरुणाईचा हैदाेस
गंगापूर धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पोहण्यास गेलेल्या दाेघा तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. १९) घडल्यानंतर गुरुवारी (दि. २०) धरणाच्या सुरक्षितेत वाढ हाेेणे अपेक्षित हाेते. प्रत्यक्षात धरणावर गुरुवारी दिवसभर सुरक्षाव्यवस्थेत वाढ हाेणे दूरच पण अाहे ती व्यवस्थाही काेलमडल्याचे दिसून अाले. धरणाच्या बाजूला असलेल्या कठड्यांवर प्रेमीयुगुले अापल्या ‘लीलां’मध्ये व्यस्त हाेती. तर महाविद्यालयीन विद्यार्थी चक्क धाेक्याची पातळी अाेलांडत थेट पाण्यात पाय बुडवून मदिरापान करीत हाेते. विशेष म्हणजे हे सर्व ‘उद्याेग’ सरकारी सीसीटीव्हीत कैद हाेतात, तरी कारवाईची गरज वाटत नाही. या अतिशय धाेकादायक ठिकाणी काही गरिबांनी चक्क संसारही थाटला अाहे. त्यांचे चिमुरडे धरणाच्या भिंतीवर उड्या मारत हाेते. धरण क्षेत्रात काेठेही सुरक्षारक्षक नव्हते. एका बाजूचे प्रवेशद्वार बंद हाेते, पण द्वारांव्यतिरिक्त धरणावर येण्यासाठी अनेक ‘खुश्किचे’ मार्ग असल्याने त्याचा वापर हाेत हाेता. चारचाकी वाहनांतही महाभागांच्या पार्ट्या सुरू असल्याचे दिसून अाले.
गंगापूर धरणात दाेन मुले बुडून मृत्युमुखी पडल्यानंतर गुरुवारी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने या ठिकाणी पाहणी केली असता सुरक्षेच्या नावाने सर्वत्र बाेंबच असल्याचे दिसले. टवाळखाेर, प्रेमीयुगुले यांचा अगदी मृत्यूच्या दारीही मुक्त संचार दिसून अाला.

दृष्टिक्षेपात...
13 तरुणांचा गेल्या चार वर्षात झाला बुडून मृत्यू
8 मजूर अाणि चाैकीदार धरण क्षेत्रात कार्यरत
4 कर्मचाऱ्यांवर रात्रपाळीत सुरक्षिततेची जबाबदारी
8 पाेलिस कर्मचारी बंदाेबस्तासाठी कायमस्वरूपी पुरविण्याची पाटबंधारे विभागाची मागणी
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा गंगापूर धरणावर तरुणाईचे फोटो...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended