आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड दिवसाच्या गणपतींचे गाेदाकाठावर विधिवत विसर्जन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -‘गणपती बाप्पा मोरया या.. पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषासह शहरात ठिकठिकाणी दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन झाले. शुक्रवारीच मोठ्या आनंदाने उत्साहात गणरायाचे घरोघरी आगमन झाले होते. मात्र, काही भाविकांच्या घरी परंपरेनुसार दीड दिवसातच बाप्पाचे विसर्जन करण्याची परंपरा असल्याने दुपारी दाेननंतर गणरायाच्या विसर्जनाला सुरुवात झाली. महानगरातील काही भाविकांनी गाेदेच्या विविध ठिकाणच्या घाटावर बाप्पाला निरोप दिला. 
 
श्री गणरायांची कालच म्हणजे चतुर्थीच्या मुहूर्तावर स्थापना करण्यात आली होती. काल रात्री आज दुपारपर्यंत असा दीड दिवस पकडला जातो. त्यानुसार शनिवारी दुपारी तीननंतर अनेकांनी विसर्जनाची तयारी केली. त्यानंतर विधिवत पूजा, आरती करून नैवेद्य दाखवून गाेदावरीत विसर्जनास सुरुवात केली. पुणे, मुंबईसह कोकणात दीड दिवसाचा गणपती मोठ्या प्रमाणात असतो. नाशकात अशा गणपतींचे प्रमाण अत्यल्प असल्याने दुपारपासून अगदी किरकाेळ प्रमाणात असलेले गणपती विसर्जनासाठी सायंकाळ उशिरापर्यंत येणे सुरू हाेते. गाेदावरीच्या काठावरदेखील पुन्हा गणरायाचे मनाेभावे पूजन करून मूर्तीचे विधिवत अाणि भावपूर्णतेने विसर्जन केले जात हाेते. 

 
बातम्या आणखी आहेत...