आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाता बाप्पाला पत्र लिहून, करा अापले मन माेकळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सध्याच्या धकाधकीच्या युगात सुसंवाद हरवत चाललाय. अशा परिस्थितीत तरुणाईतील जी मुल-मुली काेणतेही संकट किंवा अपयशाने नैराश्यग्रस्त झाले असतील, तर त्यांना अात्महत्येच्या विचारापासून परावृत्त करण्यासाठी एक अनाेखा पर्याय नाशिकच्या युवकाने सुरु केला अाहे. गणपती बाप्पा हा अापली सगळी विघ्नं दूर करताे, या मनामनातील श्रध्देचा सदुपयाेग करण्यासाठी त्यांनी ‘बाप्पास पत्र’ पाठविण्याची कल्पना पुढे अाणली अाहे. त्यासाठी शाळा, मंदिरांमध्ये ‘बाप्पाची पेटी’ बसवून त्यात तुमचे दु :ख, समस्या लिहून टाकल्यास त्यावर मानसाेपचार तज्ज्ञ किंवा संबंधित विषयातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शनाद्वारे ताेडगा काढण्यात येणार अाहे. साेशलमीडियाच्या वाढत्या वापरात मात्र व्यक्ती-व्यक्तींमधला संवाद हरवत चालला आहे. त्यामुळे पदरी पडलेले अपयश, कुंटूब वा शैक्षणिक अडचणी किवा होणारे अत्याचार कुठे व्यक्त करावे असा प्रश्न पडतो. यातून ताण-तणाव निर्माण होवून शेवटी आत्महत्येचा मार्ग निवडला जातो. या प्रकारांना आळा घालण्यासाठी नीलेश गवाडे यंानी ‘बाप्पास पत्र’ ही अनोखी संकल्पना समाजापूढे आणली आहे. मनातले व्यक्त करण्यासाठी शहरातील विविध मंदिर, शाळा या ठिकाणी बाप्पाची पेटी लावण्यात येणार आहे. आपले मनातले त्या पत्राद्वारे बाप्पाकडे व्यक्त करता येणार आहे. 
 
पेटीमध्ये प्राप्त झालेल्या पत्राची दखल घेवून त्या पत्रात उत्तर देवून अथवा मानसोपचार तज्ज्ञ, शिक्षकांच्या मदतीने त्या व्यक्तींसोबत संवाद वाढवून समूपदेशन करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरूवात म्हणून राजीवनगर येथील दत्त मंदिरात बाप्पाची पेटी लावून करण्यात आली आहे. समाजामधला हरवलेला संवाद वाढविण्यााठी तसेच आत्महत्या रोखण्याठी सुरू केलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. 
 
तर उपक्रम सार्थक ठरले 
^बाप्पाचीपेटीया उपक्रमाच्या माध्यामातून किमान एकाला आत्महत्येपासून परावृत्त करू शकलो तर या उपक्रमाचे सार्थक होईल.या उपक्रमासाठी अन्य संस्था, एनजीओ जोडल्या गेल्यास आणखी मदत होईल. -निलेश गावडे 

बाप्पाची पेटी लावण्यासाठी करा संपर्क 
मनातला भावना व्यक्त करण्यासाठी आपल्या परिसरातील मंदिर, कपंनीत अथवा शाळेत बााप्पाची पेटी लावायची असल्यास निलेश गावडे यांच्याशी ९६७३९९४९८३ या क्रमांकावर संपर्क साधावा. गावडे हे स्वखर्चातून त्या ठिकाणी पेटी बसवून देतात. 

 
बातम्या आणखी आहेत...