आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नाशिकराेड पॅटर्न’चे अनुकरण अन्यत्र हवेच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -  घनकचरा व्यवस्थापन अधिनियम- २००० नुसार ओला सुका कचरा वेगळा करणे बंधनकारक आहे. उच्च न्यायालय राष्ट्रीय हरित लवादानेही तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेने अशा प्रकारे कचरा संकलन करण्याची अट नवीन ठेक्यात घातली अाहे. गेल्यावेळी खरेदी केलेल्या घंटागाड्यांच्या वेळीही अशीच अट टाकण्यात अाली हाेती. त्यासाठी घंटागाड्यांमध्ये कचरा संकलनाची वेगवेगळी व्यवस्था हाेती. परंतु, या घंटागाड्यांची क्षमता अतिशय कमी असल्याने महिन्याभरातच कर्मचाऱ्यांनी विभाजनाची व्यवस्था काढून टाकत कचरा एकत्रितपणे संकलित करण्यास सुरुवात केली. यंदा खत प्रकल्पात कचऱ्याचे ढीग साचल्याने हरित लवादाने नवीन बांधकामांनाच बंदी अाणण्याचा निर्णय घेतला हाेता. महापालिकेने कचरा संकलन अाणि खत प्रकल्पाच्या व्यवस्थेत सुधारणा करण्याची ग्वाही प्रतिज्ञापत्रकावर देत बांधकाम परवानग्यांचा मार्ग दीड वर्षानंतर माेकळा केला. त्यानंतर घंटागाडी कंत्राटदाराबराेबर झालेल्या करारात अाेला सुका कचरा संकलित करण्याचे धाेरण महापालिका प्रशासनाने अवलंबले. नवीन घंटागाड्यांमध्ये तशी व्यवस्था करून सूचना लावण्यात अाल्या. प्रत्यक्षात मात्र अशा दाेन प्रकारात कचरा संकलन करण्याचा प्रयत्न नाशिकराेड विभागातच हाेताेय. प्रशासनाने अाता कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्याचे नियाेजन केले असले तरी त्यासाठी जनजागृतीनाही. त्यामुळे अाेला अाणि सुका कचरा म्हणजे काय अाणि ताे स्वतंत्रपणे कसा संकलित करायचा, याची माहितीच नाही. पंचवटी, पश्चिम, पूर्व, सिडकाे अाणि सातपूर या विभागात कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्यास अडचणी येत असल्या तरी नाशिकराेड विभागात डिसेंबर २०१२ पासून स्वतंत्रपणे कचरा उचलण्याची व्यवस्था यशस्वीपणे हाताळली जात अाहे. या विभागात अाेला अाणि सुका कचरा वेगळा करून द्यावा असे अावाहन करणारी कॅसेट घंटागाडीत लावण्यात येते. घंटागाडी अाल्यानंतर घंटा वाजवता कॅसेट लावली जाते. त्याद्वारे अाेला अाणि सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्यात येताे. नाशिकराेडला अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने ही याेजना राबविली जात असताना शहरातील अन्य पाच विभागांत तिची अंमलबजावणी का हाेऊ शकत नाही? असा प्रश्न उपस्थित हाेत अाहे. 
 
२० पैकी अाता तीनच ब्लॅक स्पाॅट शिल्लक 
अस्वच्छतेचे सर्वाधिक प्रमाण झाेपडपट्ट्यांमध्ये असते. नाशिकराेडला ३८ झाेपडपट्ट्या अाहेत. नेहमी कचरा टाकला जाताे असे सार्वजनिक ठिकाणांवरचे २० ब्लॅक स्पाॅट गेल्या वर्षी पालिकेने ठरवून दिले हाेते. परंतु, स्वच्छतेच्या शास्त्रशुद्ध नियाेजनामुळे अाज केवळ दाेन ते तीनच प्लॅक स्पाॅट अस्तित्वात असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत अाहे. 

कचरा एकत्रित टाकल्यास दंड 
घंटागाडीत अाेला-सुका कचरा एकत्रितपणे टाकल्यास नागरिकांना पाचशे रुपयांपर्यंत दंड तर कचऱ्याची व्यवस्था, अशा पद्धतीने केल्यास घंटागाडीला प्रतिदिन हजारांचा दंड केला जाणार अाहे. हा निर्णय एप्रिलपासून लागू हाेणार हाेता. परंत,ु महापालिकेनेच घंटागाडीत कचरा विलगीकरणाची व्यवस्था केल्याने हा निर्णय पुढे ढकलण्यात अाला अाहे. अाता लवकरच ताे कार्यान्वित हाेईल. 

पालापाचाेळ्यासाठीही वेगळी घंटागाडी 
रस्त्यावरील पालापाचाेळा काेणी उचलावा असा प्रश्न प्रशासनासमाेर असताे. पालापाचाेळ्याचे वजन कमी भरत असल्याने घंटागाडी कर्मचारी ताे उचलत नाहीत. दुसरीकडे स्वच्छतेची जबाबदारी अापली नसल्याचे कारण देत बांधकाम अाणि उद्यान विभाग जबाबदारी ढकलतात. पालापाचाेळा फांद्या रस्त्यावरच असतात. यामुळे नाशिकराेडला ठेकेदाराकडूनच स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करून रस्त्यावरील पालापाचाेळा अाणि झाडाच्या फांद्या उचलण्यात येतात. 

हाॅटेल्ससाठी स्वतंत्र घंटागाड्यांची व्यवस्था 
घंटागाड्याघरांसमाेर कमी अाणि हाॅटेल्ससमाेर अधिक काळ उभ्या राहतात अशी तक्रार शहरात सर्वत्र केली जाते. हाॅटेलचालकांकडून संबंधित कर्मचाऱ्यांना ‘चहापाणी’ मिळत असल्याने तेथे अधिक प्रामाणिकपणे सेवा दिली जाते. त्यात कालापव्यय झाल्यास घरांसमाेर कमी वेळ उभे राहण्यास पसंती दिली जाते. ही बाब लक्षात घेत नाशिकराेड विभागात ठेकेदाराने हाॅटेल्ससाठी स्वतंत्र घंटागाडीची व्यवस्था केली अाहे. 

सुका कचरा 
पुनर्वापरकरता येणारा कचरा सुका कचरा असतो. यात प्लास्टिक, लाकूड, थर्माकोल, धातूच्या वस्तू, काच, रबर, बाटल्या यांचा समावेश. 

ओला कचरा 
ज्याचेविघटन होते तो ओला कचरा मानला जातो. स्वयंपाकघरातील वा हाॅटेलमधील वाया गेलेले अन्न इतर कचरा, भाजीपाला, फळे, नारळाच्या करवंट्या, फुले, बागेतील कचरा याचा यात समावेश होतो 

विभाजनाचाच का हाेताे अाग्रह? 
{अाेला सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित केल्यास बायोगॅस अाणि खत यांची निर्मिती शास्त्राेक्त पद्धतीने हाेते. 
{ नारळाच्या करवंट्या वेगळ्या करण्यास अधिक सुकर हाेते. कचऱ्याला आग लागल्यानंतर करवंट्या सर्वाधिक काळ जळत असल्याने ही काळजी घेण्यात येते. 
{ सुका कचरा महापलिकेच्या वेगवेगळ्या गुदामांत साठवला जाऊ शकताे. हा कचरा भंगार गोळा करणाऱ्या व्यापाऱ्यांना मोफत देण्यात येताे. 
{ कचऱ्याच्या अशा वर्गीकरणामुळे घनकचरा प्रकल्पात दररोज जमा होणारा कचरा सुमारे ४० टक्क्यांनी कमी होण्यास मदत हाेते. 
{ शंभर टक्के कचरा पालिकेने उपलब्ध केलेल्या व्यवस्थेतून संकलित झाल्यास रस्ते, गटार सफाई यंत्रणेवरील ताण कमी हाेताे 
{ कचरा विभाजनामुळे घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या अाराेग्यावरही विपरीत परिणाम हाेत नाही. 
हेअाहेत लाभ 
{स्वच्छ भारत अभियानात कचरा व्यवस्थापनावरून गुण दिले जातात. 
{ सार्वजनिक अाराेग्य संवर्धनास मदत हाेते. 
{ राेगप्रतिकारक्षमता वृद्धिंगत हाेण्यास मदत हाेते. 
{ अाेला अाणि सुका कचरा वेगळा असल्यास कचऱ्याची विल्हेवाट करणे साेपे हाेते. 
{ पर्यावरण संवर्धनास मदत हाेते 
{ खताची गुणवत्ता सुधारणा हाेण्यास मदत हाेते. 
{ खताचे उत्पादन वाढते, सुका कचऱ्याचा पुनर्वापर करता येताे. 
{ लाऊडस्पीकर द्वारे केली जाते जनजागृती 
{ डेब्रिज उचलण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था 
{ रात्रपाळीत रस्त्यावरील कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र घंटागाडी. 
{ भाजीमार्केट अाणि हाॅटेलसाठी स्वतंत्र घंटागाडी 
{ प्रत्येक घरात कचरा संकलनाबाबत जागृतीपर पत्रकांचे केले वाटप 
{ इलेक्ट्राॅनिक वेस्टेज संकलित केले जाते वेगळ्या डब्यात 
{ झाेपडपट्टी परिसरात दिले जाते सर्वाधिक लक्ष 
{ एकत्रित कचरा घंटागाडीत अाल्यास कर्मचारी तेथेच तातडीने करतात कचरा विलग 
{ सुका कचरा अाणि अाेला कचरा संकलनासाठी घंटागाडीत स्वतंत्र व्यवस्था 
{ प्रत्येक घंटागाडीवर जागृतीचा फलक लावण्यात अाला. 
{ सहा प्रभागांसाठी तब्बल ३५ घंटागाड्यांची करण्यात अाली व्यवस्था 

प्रत्येक घरात दाेन डस्टबिन गरजेचे 
नियमानुसार प्रत्येक घरात दोन डस्टबिन आणि सोसायट्यांना दोन डस्टबिन ठेवणे आता बंधनकारक आहे. तसेच, घंटागाडी ठेकेदारांनाही नियमाचे पालन केल्यास प्रतिदिन पाच हजारांचा दंड केला जाणे अावश्यक अाहे. 

एका प्रभागात सलग दहा दिवस हाेईल जागृती 
यापुढेएक प्रभाग सलग दहा दिवस पिंजून काढण्याचे नियाेजन स्वच्छता निरीक्षकांनी केले अाहे. घराेघरी जाऊन जागृती करण्यात येणार अाहे. अाेला अाणि सुक्या कचऱ्याचे डस्टबिन वा संबंधित व्यवस्था तपासून बघितली जाणार अाहे. अाेल्या कचऱ्यासाठी डस्टबिन सुक्या कचऱ्यासाठी बॅगचा वापर करा असे प्रबाेधन यावेळी केले जाणार अाहे. 

सूक्ष्म नियाेजनामुळे कार्यपद्धती सुधारली 
^अाेला अाणि सुका कचरा संकलनासाठी जनजागृती करणे सर्वाधिक महत्त्वाचे अाहे. अाम्ही जनजागृतीलाच प्राधान्य दिले. तसेच, ठेकेदाराला विश्वासात घेऊन वाहनांची संख्या वाढवून घेतली. सूक्ष्म नियाेजनामुळे नाशिकराेडला अाेला अाणि सुका कचरा संकलन, तसेच ब्लॅक स्पाॅट कमी करण्यास यश अाले अाहे. हे काम निरंतर चालणार अाहे. -संजय दराडे, विभागीय स्वच्छता निरीक्षक, नाशिकराेड 
 
कसे झाले नाशिकराेडला नियाेजन यशस्वी? 
घनकचरा व्यवस्थापनाच्या अधिनियमनानुसार घंटागाडीत अाेला अाणि सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करणे अनिवार्य असताना नाशिक महापालिकेने या नियमाला केराच्या टाेपलीत टाकले हाेते. उशिरा का हाेईना महापालिकेला जाग अाली असून, शहरात स्वतंत्रपणे कचरा संकलित करण्यास सुरुवात झाली अाहे. मात्र, ही पद्धती राबविताना जनजागृतीच घडवून अाल्यामुळे नक्की अाेला काेणता अाणि सुका कचरा काेणता याबाबत नागरिक अनभिज्ञ अाहे. परिणामत: चांगल्या कार्याला छेद दिला जात अाहे. नाशिकराेड विभागात मात्र गेल्या पाच महिन्यांत अाजवर तब्बल लाख किलाे इतका अाेला कचरा संकलित झाला अाहे. त्यासाठी जनजागृती करण्याबराेबरच चपखल नियाेजनही करण्यात अाले अाहे. जी बाब नाशिकराेडला साध्य हाेऊ शकते ती शहरातील उर्वरित पाच विभागात का शक्य हाेत नाही? असा प्रश्न अाता उपस्थित हाेत अाहे. 
बातम्या आणखी आहेत...