आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: स्थानिक नेत्यांच्या वशिलेबाजीनेच सेनेचा घात, भाविसे नेत्यांचा अाराेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेना कार्यालयामध्ये सत्कार सोहळ्याप्रसंगी उपस्थित शिवसैनिक. - Divya Marathi
शिवसेना कार्यालयामध्ये सत्कार सोहळ्याप्रसंगी उपस्थित शिवसैनिक.
नाशिक - ज्यांची निवडून येण्याची पात्रता नव्हती त्यांना तिकीट वाटप करण्यात अालेत, कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांची श्रीमंती बघितली गेली, शिवसैनिकांना वेगळी जात नसतानाही तिकीट वाटपात विशिष्ट जातीला प्राधान्य देण्यात अाले, त्याचीच परिणती म्हणजे शहरात शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला; स्थानिक नेत्यांच्या वशिलेबाजीनेच शिवसेनेचा घात केला असा ‘घरचा अाहेर’ भारतीय विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यालयात रविवारी (दि. २६) दिला. कार्यकर्त्यांनी केवळ तुमचे झेंडेच मिरवायचे का, त्यांनी कधी नेतृत्व करायचेच नाही का, असे संतप्त सवाल यावेळी करण्यात अालेत. 
 
शिवसेना अाणि या पक्षाची अंगीकृत संघटना भारतीय विद्यार्थी सेना यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभी फूट पडल्याची प्रचिती शिवसेना कार्यालयात झालेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार कार्यक्रमात अाली. विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी संदीप गायकर अाणि दिगंबर माेगरे यांच्या पत्नी अनुक्रमे हर्षदा गायकर अाणि पूनम माेगरे या यंदा निवडून अाल्या अाहेत. यानिमित्त विद्यार्थी सेनेने त्यांचा सत्काराचा कार्यक्रम स्वतंत्रपणे अायाेजित केला हाेता. यावेळी निवडून अालेल्या उमेदवारांचे काैतुक कमी अाणि निवडणुकीतील अपयशावरच अधिक चर्चा करण्यात अाली. कार्यक्रमात बाेलताना कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांप्रति तिखट शब्दात 
संतप्त भावना व्यक्त केल्या. तसेच काही कार्यकर्ते यावेळी भावनिकही झाले हाेते. व्यासपीठावर शिवसेना मध्य नाशिकचे उपमहानगरप्रमुख राजेंद्र क्षीरसागर, भाविसेचे महानगरप्रमुख संदीप गायकर, पंचवटीचे उपमहानगरप्रमुख दिगंबर माेगरे, पंचवटी युवा सेनेचे महानगर चिटणीस गाेकुळ मते, सातपूरचे विभागप्रमुख युवराज धात्रक अादी उपस्थित हाेते. 
 
माेगरे हेच विधानसभेचे उमेदवार 
भाजपचे अामदार बाळासाहेब सानप यांचे प्रभाव क्षेत्र असलेल्या प्रभाग क्रमांक मधून एका जागेवर विजय मिळविलेल्या पूनम माेगरे यांचे पती दिगंबर माेगरे हेच विधानसभेचे पुढील उमेदवार असतील, असे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमात जाहीरही करून टाकले. त्यांच्या पाठीशी पूर्णत: भाविसे पूर्ण ताकदीनिशी उभी राहील, असेही यावेळी सांगण्यात अाले. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, चुका सुधारून पुढे जाण्याची गरज, 
कार्यकर्त्यांनी झेंडेच फिरवायचे का?, सामना जाळणाऱ्यांना तिकीट...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...