आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराफांतर्फे लाक्षणिक उपोषण, सुवर्णकार कारागिरांवर मोठा अन्याय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सराफी व्यवसायावरील अबकारी कर पूर्णतः रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सराफा व्यावसायिकांनी तीन दिवस लाक्षणिक उपोषण सुरू केले. शनिवारी सकाळी १० वाजता हे उपोषणाला सुरू झाले.

गेल्या चाळीस दिवसांपासून सुरू असलेले सराफांचे अबकारी कराविरोधातील आंदोलन आता आणखी तीव्र होताना दिसून येत आहे. मोठ्या व्यापारवृद्धीची संधी असतानाही सराफा व्यावसायिकांनी जाचक कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी पाडव्यालाही बंदच पाळला. कर रद्द करत नाही तोपर्यंत दुकाने उघडणार नसल्याचे राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनने सांगितले आहे.

चाळीस दिवसांनंतरही सराफांची मोठी एकजूट असल्याचे चित्र दिसून आले आहे. येत्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही नाशिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र ओढेकर पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. शनिवारी दिवसभरात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषणार्थीची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नाशिक सराफा असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र ओढेकर, गिरीश टकले, राजेंद्र दिंडोरकर, संजय दंडगव्हाळ, राजेंद्र शहाणे, गिरीश नवसे, प्रसाद आडगावकर, किशोर दुसाने, राजेंद्र भावसार, रमेश वाखारकर, अनिल दुसाने, सुनील वाघ, ईश्वर सोनवणे, दीपक शिऊरकर आदींसह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी सराफा व्यावसायिकांनी शनिवारी दिवसभर उपोषणार्थीची भेट घेऊन साखळी उपोषणात सहभाग घेतला. तर रविवारी तसेच सोमवारीही जिल्ह्यातील बहुतांश भागांतील सराफा व्यावसायिक नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणात सहभागी होणार आहेत.

- हातावर पोटअसणाऱ्या सुवर्ण कारागिरांवर गेल्या महिनाभरापासून काम नसल्याने उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. - गिरीश टकले, सल्लागार,महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन
- "१९६३ ते१९९० काळात या जाचक कायद्याच्या चक्रव्यू्हात अडकून व्यवसाय करू शकल्याने बेरोजगार झालेल्या १०९ सराफांनी आत्महत्या केली. इन्स्पेक्टरराज सहन करण्यापेक्षा त्यांनी मृत्यूला कवटाळले. आता पुन्हा तोच जाचक कायदा आमच्यावर लादण्याचा घाट घातला आहे. गेल्या चाळीस दिवसांतच देशभरात सुमारे आठ कारागिरांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. राजेंद्र ओढेकर, अध्यक्ष,नाशिक सराफ असोसिएशन
- सरकारच्याया चुकीच्या धोरणामुळे सुवर्ण व्यवसायाशी निगडित काही व्यक्तींनी आर्थिक कोंडीत अडकल्याने आत्महत्या केल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. - राजेंद्र दिंडोरकर, माजीअध्यक्ष, सराफ असोसिएशन, नाशिक
- केंद्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे गेल्या ४० दिवसांपासून सराफ कारागीर संप करत आहेत. मात्र, सरकार या प्रश्नाकडे गांभीर्याने पहात नसल्याने आता दाद तरी कुणाकडे मागायची? - गिरीश नवसे, विभागीयउपाध्यक्ष, राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन