आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वस्तू विक्रीच्या सक्तीची ‘पाठशाळा’ शिक्षण मंदिरातच...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
नाशिक - अलीकडेच सर्वाच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णय देत शाळांमध्ये शिक्षणाव्यतिरिक्त थाटलेला वस्तू विक्रीचा बाजार बंद करण्याचे अादेश दिले. प्रत्यक्षात अनेक शाळांनी त्यास साेयीस्करपणे केराची टाेपली दाखवली त्याचे प्रमुख कारण म्हणजे नियंत्रण यंत्रणा सुस्त असून अशापद्धतीने वस्तू विक्री केली तर काेणतीही कारवाई हाेणशर नाही ही त्यांना खात्री अाहे यासंदर्भात तक्रारी अाल्यावर डी.बी स्टारने काही शाळांचा माग घेत येथे वस्तू विक्रीची शाळा कशी भरते याची माहिती घेतली असता वेगळेच वास्तव समाेर अाले अाहे. 
 
{शाळांकडूनसर्सार पुस्तके, वह्या आणि गणवेश विक्री केली जात आहे? त्यांना परवानगी आहे का? 
{अजिबातनाही. अशा शाळांवर आपण थेट कारवाई केली आहे. पालकांनीही तक्रारी दिल्यास आपण कठोर कारवाई करु. 
{न्यायालयाचेआदेश असतानाही शाळांची मनमानी सुरुच आहे, त्याबबात काय सांगाल ? 
{न्यायालयाचेआदेशा सोबतच मी देखील परिपत्रक काढून शाळांना अशी वस्तू विक्री करता येणार नसल्याचे आदेश दिले आहेत. तरीही कुठली शाळा विक्री करत असेल तर कारवाई होईलच. 
{तक्रारीयेऊनही आपण कारवाई करत नसल्याचा पालकांचा आरोप आहे काय सांगाल ? 
{असेहोणार नाही. केंब्रीज शाळेची तक्रार आली होती. आपण तीची तपासणी केली. शाळेची एनओसी रद्दचा अंतिम नोटीसही दिली आहे. केवळ शाळेच्या मुख्यध्यापकांनी बाजू मांडण्याची विनंती केली म्हणून त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर पुढील कारवाई करु. - 
{पुस्तकेविक्रीचा सर्वच शाळांमध्ये धंदा सुरु आहे. 
{सर्वैाच्चन्यायालयानेही अशी वस्तू विक्री करता येणार नसल्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. आपणी पत्रक काढले आहे. तहीही असे होत असेल तर पालकांनी तक्रार करावी. 
नितीन उपासनी, प्रशासन अधिकार, महानगरपालिका शिक्षण मंडळ 

मी या विषयावर बोलण्यास इच्छुकच नाही. 
^आमच्या शाळेत आता सुट्टया चालू आहे. त्यामुळे पुस्तके, गणवेश आणि इतर कुठल्याही बाबींच्या विक्रीचा प्रश्न येत नाही. मी या विषयावर बोलण्यास उत्सुक नाही. सोमूनादेर, मुख्यध्यापककेंब्रीज स्कूल 

पालकांना काेणतीही बंधने नाहीत... 
^आम्हीशालेयसाहित्यखरेदीसाठी कुठलेही बंधन घातलेले नाही. केवळ पालकांना पर्याय दिला. त्यांच्या सोयीसाठीही सुविधाच शाळेने दिली आहे. त्यांना पाहिजे तर घेतील अथवा नाही घेणार. आमच्या दृष्टीने मुलांना शिक्षणासाठी फायदेशीर बाबी असतील त्या नोटबूकमध्ये देतो. मुलांच्या ज्ञानासाठी ज्या-ज्या बाबी उपयोग आहे. त्या देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. विनोदकपूर, अध्यक्षआदर्श शाळा, 

विक्रेत्यांची विनंती अाणि पालकांची अनुमती हवीच 
^शाळेतआम्हीस्वत: कुठलाही स़्टॉल लावत नाही. परंतु काही विक्रेत्यांनी विनंती केल्यास आणि पालकांची परवानगीनेच त्यांना अनुमती दिली आहे. शाळेने बंधनकारक केले नाही. पालक कुठल्याही दुकानातून त्याची खरेदी करु शकतात. पालकांना वाटल्यास ते परतही देऊ शकतात. विक्रेताही परत घेतो. शिक्षणाचा दर्जा टिकावा म्हणूनच आमचे प्रयत्न आहे. पण कोणालाही बळजबरी आम्ही करत नाही. केवळ पालकांच्या सुविधेसाठीच आम्ही या सोयी उपलब्ध करुन देतो. त्यांच्याच आग्रहाने माधुरीकसबे, मुध्याध्यापिकासेंट लॉरेन्स स्कूल 

पालकांना स्वातंत्र्य अाहे; फक्त एकसारखेपणा असावा 
^पालकांनीहवेत्या ठिकाणाहून, दुकानातून ते घेऊ शकतात. यंदा केवळ मटेरिअल बदलले आहे. त्यामुळे रंग इतर बाबींमध्ये फरक येऊ नये यासाठीच सुयोग कलेक्शन या दुकानातून ते पालकांच्या सुविधेसाठीच उपलब्ध केले आहे. पण पालकांनी त्याच पध्दतीचे कपडे किंवा वह्या आणि इतर बाबी बाजारात मिळत असतील तर तेथून घेतल्या तरीही चालेल. त्यांना स्वातंत्र्य आहे. पुस्तके, वह्या खरेदीत ज्योति बुक्सने एकुण बिलापेक्षा जादा घेतलेले पाचशे रुपये हे स्कूलचे मँगजीन, डायरी, आयकार्डचे आहेत. त्यामुळे ते उगाच जादा पैसे घेतले असे होणार नाही. सिस्टरथेरेसे, प्राचार्यसँक्रीड हार्ट स्कूल 

सारा मामला कव्हरपेजचा 
शाळांनी वह्यांसोबत इतर बाबींच्या विक्रीवर अगदी उत्तम पर्याय शोधला आहे. वह्यांच्या तसचे डायरी, मेगँझीन, कँलेंडरला शाळेच्या नावाचे कव्हरपेज प्रिंट केले जाते. त्यामुळे शाळेच्या ठरवून दिलेल्या दुकानांतून याची खरेदी झालीच नाही तर मात्र असे विद्यार्थी चटकन निवडून पडतात. शाळेचे शिक्षक त्यांचा रागराग करतात. त्यांना मानसिक त्रासही देतात. त्यामुळे पालकही कुठलिही तक्रार करता सरळ शाळा म्हणेल तसे पैसे भलेही कर्ज काढून, दागीने गहान ठेवूनही भरत असल्याचे काही पालकांनी नाव छापण्याच्या अटीवर सांगितले आहे. 

सॅक्रीट हार्ट: वह्या पुस्तकांमध्ये ५०० रुपये वाढीव 
सँक्रीटहार्ट शाळेने सर्व वह्या पुस्तकांसाठी ज्योति बुक्ससोबत टायअप केले आहे. पालकांनाही त्यांनी येथूनच वह्या,पुस्तके, वर्कबुक घेण्याचे आदेश दिले आहेत. ज्योती बुक्सकडून इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या वस्तूंची किंमत हजार ७५० रुपये होते. परंतु ज्योती बुक्सने हजार २५० रुपये म्हणजे ५०० (पाचशे) रुपये वाढीव घेतले आहे. ते वाढीव पैसे कशाचे घेतले हे देखील सांगण्याचे सौजन्य दुकानदार किंवा शाळेच्या वतीने प्रथम करण्यातच आले नाही. जेव्हा तक्रारी वाढल्या त्यानंतरच दुकानदारांकडून आणि शाळेकडून हे पैसे कँलेंडर, डायरी, आयकार्डचे असल्याचे तोंडी सांगण्यात आले आहे. पण लेखी कुठलेही नोंद त्यावर नसल्याने यात काहीतरी काळेबेर झाल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला आहे. तर गणवेशासाठीही दुकान ठरवून दिले आहे. 

अशी भरते वस्तु विक्रीची ‘शाळा’ 
शाळांना शालेय साहित्याची विक्री करण्याचा अधिकार नसतानाही शाळांनी थेट अापल्या इमारतीतच दुकाने थाटली आहेत. तेथेच दप्तराचीही विक्री केली जात आहे. तर काही शाळांनी काढलेल्या परिपत्रकातच पुस्तकाचे दुकान, गणवेशाचे दुकानाचे नाव आणि पत्ता दिला असून तेथूनच वस्तू खरेदी करण्यास सांगण्यात आल्याचे शाळेच्या आवारात गेले असता काही पालकांनी सांगितले. तर एकाच वेळी दुकानांत गर्दी होऊ नये म्हणून प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळ्या तारखांचे वेळापत्रकही दिलेले अाहे. पालकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली तर काहींनी थेट शिक्षणाधिका-यांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यात न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणीची जबाबादारी असलेल्या यंत्रणांकडून त्यावर अपेक्षित कार्यवाही हाेत नाही. केवळ आदेशाच्या अनुसरुन शिक्षणाधिका-यांनी या संदर्भात परिपत्रक काढण्यातच धन्यता मानली. या बद्दल पालकांमध्ये राेष अाहे. तर याच शाळांच्या शिक्षणाच्या बाजारी करणाबाबत, ते विकत असलेल्या शालेय वस्तूच्या संदर्भात डी.बी. स्टारने संपर्क साधला असता, काही शाळांनी आम्ही सक्ती केली नसल्याचे सांगितले. केवळ पालकांच्या सोयीसाठीच आम्ही त्यांना पर्याय उपलब्ध करुन दिल्याचे सांगत वेळ मारुन नेण्याचाही प्रयत्न केला. तर काही शाळांच्या मुख्यध्यापकांनी थेट आम्हाला याबाबत बोलण्यातच रस नसल्याचे सांगत प्रतिसादतच देता ही विक्री केली जात असल्याचे एकप्रकारे कबूलच केले. 

केंब्रिज शाळा: खरेदी बंधनकारक 
याशाळेने साहित्य घेणे बंधनकारक केले. अभ्यासक्रमांबराेबरच इतर पुस्तकेही विकत घेण्यासाठी सक्ती केली जाते. अभ्यासक्रमांव्यतिरिक्त १७-१८ पुस्तके खरेदीचे बंधन घातले जाते. त्याची किंमत जवळपास ते हजार आहे. 
 
केस नंबर 
आदर्श स्कूल : चार्टच दिला हाती 

आदर्शशाळेने इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भात जाहीर केलेल्या नोटीसमध्ये इतर बाबींबरोबर स्कूल बॅग, वह्यांसाठीच्या रकमेचा चार्टच पालकांना देत प्रवेशाच्या वेळी याबाबतचे सर्व शुल्क भरण्याच्या सूचना दिल्या अाहेत. 
 
केस नंबर : 
सँक्रीड हार्ट: ५०० रुपयांची वसूली 

सँक्रीडहार्ड स्कूलने वह्या, पुस्तके आणि इतर साहीत्य खरेदीसाठी पालकांना ज्योति बुक स्टोअर्सचा पत्ता दिला. शिवाय इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांकडून सर्व वस्तूची किंमत २७५० रुपये झाल्यानंतर अधिकचे ५०० रुपये बेनामी वसूल केले. 
बातम्या आणखी आहेत...