आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात सरकारी इलेक्ट्रिक उद्याेगाची गितेंकडे मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘मेकइन नाशिक’ या उपक्रमानंतर नाशिकमध्ये प्रत्यक्षात अाैद्याेगिक गुंतवणूक येण्यासाठी सुरू झालेल्या पाठपुराव्याचा एक भाग म्हणून शनिवारी (दि. २४) शहरातील अाैद्याेगिक संघटनांच्या प्रतिनिधींसह खासदार हेमंत गाेडसे यांनी केंद्रीय अवजड उद्याेगमंत्री अनंत गिते यांची मुंबईत भेट घेऊन नाशिक इलेक्ट्रिक हब असल्याने येथे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड किंवा जनरल इलेक्ट्रिकल्स यासारखा सार्वजनिक क्षेत्रातील उद्याेग सुरू करण्याची मागणी केली. या संदर्भात सार्वजनिक क्षेत्रातील निवडक कंपन्यांची दिल्लीत बैठक घेऊन त्यात नाशिकच्या शिष्टमंडळालाही समाविष्ट करीत याबाबत चाचपणी करण्याचे अाश्वासन गिते यांनी दिले. निमाने मे मध्ये मुंबईत दाेन दिवसांच्या ‘मेक इन नाशिक’ या उपक्रमाचे अायाेजन केले हाेते. गिते यांच्या हस्तेच त्या उपक्रमाचे उद‌्घाटन झाले हाेते. त्यावेळी ‘तुम्ही मागाल ताे अवजड किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उद्याेग नाशिकला देऊ’, असे अाश्वासन त्यांनी दिले हाेते. त्या दृष्टीने शनिवारची बैठक महत्त्वाची मानली जात हाेती. या बैठकीत गिते यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने दिल्लीत हाेणाऱ्या बैठकीकडे अाता उद्याेग क्षेत्राचे लक्ष लागले अाहे. गिते यांच्याकडे नाशिककरांच्या उद्याेगविषयक मागण्यांचे निवेदन खासदार हेमंत गाेडसे, निमाचे सचिव ज्ञानेश्वर गाेपाळे, अाशिष नहार, अायमाचे अधयक्ष राजेंद्र अहिरे अन्य उद्याेजकांनी दिले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...