आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘मी निकालार्थी, हे माझे सरकार...’, राज्य नाट्य स्पर्धेच्या जीअारबाबत उडवली जातेय खिल्ली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - स्पर्धा सुरू झाली, रंगकर्मींनी ‘हे माझे सरकार’ असे म्हणावे, या अपेक्षेने सांस्कृतिक मंत्र्यांनी दाेन नाटके अंतीम फेरीत जाण्याच्या घाेषणा केली. (की विनाेद) पण, त्याच्या निधीचा निर्णय अर्थखात्याच्या ‘तावडीत’ असल्याने अाणि त्यासंदर्भातील जीअार प्रसिद्ध हाेत नसल्याने स्पर्धेच्या निकालांवर पडदा पडेना. त्यामुळेच रंगकर्मी नाईलाजाने वा खिल्लीने म्हणू लागले... मी निकालार्थी..., हे माझे सरकार...! 

 

५७ वी राज्य नाट्य स्पर्धा राज्यातील काही केंद्रांवर अद्यापही सुरू अाहे. मात्र १९ केंद्रांपैकी अनेक केंद्रांवर स्पर्धा संपली अाहे तरीही निकाल अद्यापही जाहीर हाेत नसल्याने रंगकर्मी हवालदिल झाले अाहेत. पण अापल्या निकालावर याचा परिणाम हाेईल म्हणून बिचारे ‘मी निकालार्थी... हे माझे सरकार’ म्हणत कुजबूज करून अापल्या भावनांना वाट करून देत अाहेत. नाशिक केंद्रावरील स्पर्धा शनिवारी (दि. २५) संपली. रविवारी सांस्कृतिक मंत्री विनाेद तावडे नाशिकमध्ये अाले असता त्यांनी साेमवार किंवा मंगळवारी दाेन नाटके अंतीम फेरीत दाखल हाेतील या संदर्भातील अध्यादेश प्रसिद्ध हाेईल असे सांगितले. त्यामुळे रंगकर्मींमध्ये उत्साह संचारला हाेता. मात्र साेमवार गेला तरी काही निकाल हाती येईना अाणि जीअारही. मंगळवारी कॅबिनेटची मिटींग असते त्यावेळी तरी काहीतरी निर्णय हाेईल ही अपेक्षाही फाेल ठरली अाणि रंगकर्मींना पुन्हा म्हणावे लागले ‘मी निकालार्थी... हे माझे सरकार’.

 

मंगळवारीही राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्याने साेशल मीडियावर या दप्तर दिरंगाईची चांगलीच खिल्ली उडाली. नटसम्राटमधील काेणी घर देतं का घर याप्रमाणे काेणी निकाल देतं का निकाल, काेणी जीअार काढतं का जीअार अशी पाेस्ट दुपारनंतर व्हाॅट्सअॅपवर फिरू लागली. तसेच ज्यांना स्पर्धेत नंबर मिळणार अाहे अाणि जे बाहेर पडणार अाहे त्यांच्यासाठी निकाल या शब्दावर काेटी करत ‘निकाल’ हा शब्द वापरून ‘मेरे पास ताे नही है...’ असा संवादही दिवसभर फिरत हाेता. त्यापैकीच एक पाेस्ट हाेती ती ‘मी निकालार्थी... हे माझे सरकार’ या वाक्याची. जर बुधवारीही स्पर्धक पारिताेषिकांचे ‘लाभार्थी’ झाले नाही तर सरकारच्या मी लाभार्थी जाहिरातीतील घटनेची जशी पाेलखाेल झाली ताेच हा प्रकार ठरेल. 


पुढील स्‍लाइडवर...साेशल मीडियावर नाटकाच्या निकालाबाबतच्य प्रतिक्रिया...  

बातम्या आणखी आहेत...