आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वासाने सत्ता दिली; लोकांची कामे करा- पालकमंत्री गिरीश महाजन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेच्या माध्यमातून लोकांची कामे केली तर पक्ष तर वाढतोच, मात्र निवडून येण्यासाठी कसरत करावी लागत नाही. भाजपला नाशिककरांनी विश्वासाने बहुमत दिले, त्यामुळे नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी एकोप्याने लोकांची कामे केली पाहिजे, अशा कानपिचक्या पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सत्ताधारी नगरसेवकांना दिल्या. 

तब्बल, अडीच तास ‘वसंतस्मृती’ या पक्षकार्यालयात चाललेल्या बैठकीत महापालिकेतील महापौर सभागृहनेत्यांच्या समांतर सत्ताकेंद्रांबाबतही त्यांनी अप्रत्यक्ष कान टोचले. महापालिकेत भाजपचे ६६ नगरसेवक असून स्पष्ट बहुमत असलेला महापालिकेच्या इतिहासातील पहिला पक्ष आहे. सत्ता मिळून सहा महिने झाले असून, गेल्या काही दिवसांत पक्षातील अंतर्गत कुरबुरीची जाहीरपणे चर्चा सुरू होती. वर्तमानपत्रातही बातम्या येत असल्यामुळे पक्षाची बदनामी होत असल्याच्या नगरसेवकांच्याच तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर महाजन यांनी खडे बोल सुनावले. लोकांची कामे करणे अत्यंत महत्त्वाचे असून काम केली तर निवडून येण्यासाठी बाकी काही करावे लागत नाही. नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात पक्ष संघटनेला वेळ दिला पाहिजे. उगाच कुरबुरीत वेळ घालवण्याची गरज नाही, कोणाची काही तक्रार असेल तर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढावा, अशाही सूचना त्यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 
काही नगरसेवकांशी गुफ्तगू : उपमहापौरप्रथमेश गिते, सभागृहनेता दिनकर पाटील अन्य नगरसेवकांशी गुप्तपणे चर्चा करून पालिकेच्या कामकाजाबाबत पालकमंत्र्यांनी माहिती घेतल्याचे समजते. ठराव करताना महापौरासह पदाधिकारी विश्वासात घेत नसल्याच्या तक्रारी केल्याचे सांगितले जाते. 
 
थेट संपर्क साधा : पालिका पदाधिकाऱ्यांविषयी नगरसेवकांची तक्रार असेल तर थेट संपर्क साधा, असे अभयही पालकमंत्र्यांनी दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे काही नाराज नगरसेवक सुखावले. पक्षाचे निर्णय घेताना ज्येष्ठांना डावलले जाण्याच्या तक्रारी असून या पार्श्वभूमीवर महाजन यांनी मुख्यमंत्री तसेच सर्वांचेच दरवाजे खुले असल्याचे स्पष्ट केले. 
 
महाजन म्हणतात, करवाढ योग्यच : अनेकवर्षांपासून पालिकेच्या करात वाढ झालेली नाही. त्यामुळे विकासकामांसाठी करवाढ आवश्यक असल्याचे सांगत, पालकमंत्री महाजन यांनी भाजपने पालिकेत मांडलेल्या करवाढीचे समर्थन केले. तसेच प्रामाणिक करदात्यांवर मात्र अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्याचेही त्यांनी अाश्वासित केले. नोंदणी नसलेल्या मालमत्ता रडारवर आणू करबुडव्यांवर कारवाई करू असे सांगत करवाढ होणार असल्याचेही स्पष्टच केले. 
 
महापालिकेत आता पालकमंत्री महाजन लक्ष घालणार  
महापालिकेतील पदाधिकारी नगरसेवकांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. अनेक बाबींवरून त्यांच्यात वाद सुरू आहे. या वादावादीमुळे पक्षाचे तर नुकसान होतेच, शिवाय जनताही त्यात भरडली जात असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना कबूल करत आता स्वत:च महापालिकेत लक्ष घालणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पदाधिकाऱ्यांमध्ये एकवाक्यता नाही, परस्पर निर्णय घेतले जातात. त्यामुळे वादविवाद आहेत. ते टाळण्यासाठी आता मीच पुढच्या काळात बारकाईने महापालिकेच्या कारभारात लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
नाशिक, दिंडाेरी लाेकसभा भाजप स्वबळावर लढणार 
नाशिक - लाेकसभा विधानसभा निवडणूक साधारण एकाचवेळी हाेण्याची शक्यता व्यक्त करतानाच जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक दिंडाेरी या दाेन्ही लाेकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले. उत्तर प्रदेश निवडणुकीप्रमाणे मतदार यादीतील एका पानाला एक समन्वय नियुक्ती करून तळापर्यंत पाेहाेचण्याची रणनीती नाशिकमध्येही अाखण्याचे अादेश शहर जिल्हाध्यक्षांनाही दिले. 
 
लाेकसभा निवडणूक पावणेदाेन वर्षांनी हाेत असली, तरी अातापासूनच त्याचे ढाेल वाजण्यास सुरुवात झाली अाहे. गेल्यावेळी लाेकसभा निवडणूक महायुतीद्वारे लढली गेली. नाशिक लाेकसभा मतदारसंघ शिवसेनेला तर दिंडाेरी मालेगावचा काही भाग असलेला धुळे लाेकसभा मतदारसंघ भाजपला साेडला हाेता. हे तिन्ही मतदारसंघ महायुतीने जिंकले हाेते. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेची फारकत हाेऊन त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवली. त्यात भाजपला शहरातील तिन्ही मतदारसंघात यश मिळाल्याने तसेच महापालिकेच्या इतिहासात प्रथमच बहुमताद्वारे भाजपला सत्ता मिळाल्याने अपेक्षा वाढल्या अाहेत. याच पार्श्वभूमीवर महाजन यांनी ‘वसंतस्मृती’ या पक्षकार्यालयात नगरसेवकांच्या बैठकीत लाेकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले. त्यादृष्टीने प्रत्येकापर्यंत पक्षाचे कामकाज पाेहाेचवावे, असाही सल्ला त्यांनी दिला. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवण्यासाठी तळापर्यंत कार्यकर्त्यांची मजबूत फळी निर्माण केली. त्यामुळे नगरसेवकांनी संघटनेकडे लक्ष केंद्रित करावे, तसेच उत्तर प्रदेशप्रमाणे मतदार यादीच्या प्रत्येक पानासाठी एक व्यक्ती नेमून त्यांच्याकडून मतदारांवर लक्ष केंद्रित करावे. 
 
राणेंसहबडे काँग्रेस नेते संपर्कात : पालकमंत्री महाजन : नारायणराणेच नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादीसह इतरही पक्षांचे अनेक बडे नेते भाजपच्या संपर्कात आहे. त्यांच्या प्रवेशाबाबत मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष दानवे अशी पक्षीयस्तरावर प्रक्रिया सुरू अाहे. परंतु, पंतप्रधान माेदी यांच्या ध्येयानुसार काँग्रेसमुक्त भारताच्या दिशेने आम्ही पुढे सरकत असून लवकरच महाराष्ट्रही काँग्रेसमुक्त करणार असल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये सांगितले. एकनाथ खडसेंनी भाजपत सध्या बरे चाललं नसल्याच्या व्यक्तव्यावर ते काहीही बाेलले नाही, महाजन यांनी ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगितले. 
 
अवयवदानासाठी द्यावे नगरसेवकांनी याेगदान 
४० हजार अवयवांची अाजघडीला गरज असून तितके अवयवदाते उपलब्ध नाही. अवयवदानाचे महत्त्व लाेकांना पटवून देण्यासाठी नगरसेवकांनी प्रयत्न करावे, असेही अावाहन महाजन यांनी केले. अशा कामामधून लाेकांचा पक्षावरील विश्वास वाढताे समाजकार्याचा पक्षालाही फायदा हाेताे, असेही त्यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...