आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरू गोविंदसिंग शौर्य पुरस्कार निकम यांना, गुरुद्वारा भाई दयासिंह गुरूद्वारात आज वितरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - स्व.हरनामसिंग वधवा यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा या वर्षीचा गुरू गोविंदसिंग शौर्य पुरस्कार विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांना जाहीर झाला आहे. गुरूवारी (५ जानेवारी) गुरू गोविंदसिंग यांच्या ३५० व्या जयंतीच्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती गुरूद्वाराचे प्रवक्ता हरजितसिंग वधवा यांनी दिली. 
विविध क्षेत्रांत शारीरिक किंवा बौद्धिक पातळीवर शौर्य, विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत अनेक अधिकारी आणि नागरिकांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. यावर्षी अॅड. निकम हे पुरस्काराचे मानकरी आहेत. आतापर्यंत त्यांनी विविध खटले चालवून देशाचे आणि समाजाचे शत्रू ठरलेल्या कित्येक आरोपींना फाशी किंवा जन्मठेप शिक्षा मिळवून दिली आहे. नगर जिल्ह्यातील अनेक गाजलेल्या खटल्यांमध्येही त्यांनी यशस्वी कामगिरी बजावली आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांची पुरस्काराची निवड करण्यात आल्याचे वधवा यांनी सांगितले. गोविंदपुरा येथील गुरुद्वारा भाई दयासिंह येथे गुरुवारी होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण गुरू नानक देवजी यांचे वंशज बाबाजी सुखदीपसिंह बेदी यांच्या हस्ते अणि अध्यक्ष श्रीगुरदयालसिंह वाही समाज बांधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार असल्याचे वधवा यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...