आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदयराेगग्रस्त जुळ्या जाई-जुईला मिळाले अमेरिकेतील अाई-बाबा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जिल्हा रुग्णालयात जुळ्या चिमुकल्यांना बेवारस साेडून जात मातेने पलायन केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली हाेती. या मुलींचे एकाएकी मातृछत्र हरपले असतानाच त्यांना हृदयाशी संबंधित गंभीर अाजार असल्याचीही बाब काही कालावधीत पुढे अाली हाेती. त्यामुळे या जाई-जुईच्या भवितव्याचे काय अशी चिंता अाधाराश्रमाला भेडसावत हाेती. परंतु, अमेरिकेतील एका दांपत्याने या दाेन्ही मुलींना अापलेसे केले अाहे. हे दांपत्य साेमवारी (दि. २९) दत्तक घेण्यासाठी अाधाराश्रमात येत अाहे. 
 
केअरिंग (चाइल्ड अॅडॉप्शन रिसोर्स इन्फॉर्मेशन अँड गायडन्स सिस्टिम)ची तरतूद आल्यापासून भारतातून परदेशात शारीरिकदृष्ट्या अधू मुलं दत्तक देण्यास परवानगी मिळाली अाहे. दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या ‘सेंट्रल अॅडॉप्शन रिसोर्स अॅथाॅरिटी’ने (कारा) मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिली. त्यात अशा बालकांच्या काळजीच्या पद्धतीत बदल करून परदेशातील नागरिकांनाही ऑनलाइन पद्धतीने भारतातील मुले दत्तक घेण्याची मुभा दिली. या पद्धतीमुळे जाई-जुईला नाेकरदार ख्रिस्ताेफर अाणि शिक्षिका तारा हिटगर यांनी दत्तक घेतले अाहे. या दांपत्याला अाधीची सात वर्षांची मुलगीही अाहे. 

अाम्ही भारताच्या संस्कृतीने प्रभावित 
^१९८३ साली अाम्ही भारतात अालाे हाेताे. तेव्हा हा देश अाणि येथील संस्कृतीने अाम्हाला माेहिनी घातली हाेती. मुलगी दत्तक घेण्याचा विचार मनात अाला तेव्हा अामच्यासमाेर प्रथम भारतच अाला. त्यात दाेन जुळ्या मुली मिळाल्याने अाम्हाला खूपच अानंद झाला अाहे. -ख्रिस्ताेफर हिटगर 

 
बातम्या आणखी आहेत...