आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसळधार पावसाने 5 वर्षांत गंगापूर, दारणात सर्वाधिक पाणीसाठा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नाशिक  - यंदा पंधरा दिवस पावसाने उघडीप दिली असली तरीही त्याची तूट मागील तीन दिवसांत भरून काढली आहे. सतत पडलेल्या मुसळधार पावसाने यंदा गंगापूर आणि दारणा धरणात १५ जुलै रोजी गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गंगापूरमध्ये ६८, तर दारणात ७८ टक्के पाणी साचले आहे.   
 
गेल्या वर्षाचा अपवाद वगळता पाच वर्षांपासून जिल्ह्याचे पर्जन्यमान सरासरी किंवा त्यापेक्षा कमीच राहिले आहे. त्यामुळे धरणांच्या साठ्यांतही सरासरी इतकेच पाणी उपलब्ध झाल्याचे आकड्यांवरून दिसून येत आहे. २०१४ आणि २०१५ मध्ये १५ जुलैला गंगापूर धरण, तर ४० टक्क्यांपेक्षा कमीच भरले होते. पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यातच पाणलोट क्षेत्र असलेले धरण २०१५ मध्ये निम्मे भरले होते. पण, अगाेदरच्या वर्षी म्हणजे २०१४ मध्ये अवघे ५ टक्केच पाणी धरणात होते. त्यावरूनच गत दोन वर्षांची स्थिती लक्षात येते. मागील वर्षी तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र वाद अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला. नाशिक शहराची पिण्याची पाण्याची भिस्त असलेल्या गंगापूरमधूनदेखील सव्वा टीएमसीपेक्षा जास्त पाणी सोडण्याची वेळ नाशिककरांवर आली होती. पण, त्यानंतर जो पावसाने दाणादाण उडवली. त्यामुळे जायकवाडीसह मराठवाड्यातील सर्व धरणे भरली. जिल्ह्यातील विविध धरणांतून, नद्यांद्वारे मराठवाड्यास १०० टीएमसीच्या आसपास पाण्याचा विसर्ग झाला होता. २०१६ सालच्या पावसाने धरणे काठोकाठ भरल्याने बहुतांशी पाणी धरणात शिल्लक होतेच. त्यामुळे धरणे लवकर भरली.