आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्मेटअभावी दाेन महिन्यांत 16 दुचाकीस्वारांचा मृत्यू, तरुणांची उदासीनता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- रस्ता सुरक्षेअंतर्गत हेल्मेट वापराबाबत पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या प्रभावी जनजागृतीकडे दुचाकी वाहनचालकांकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. जानेवारी ते २८ फेब्रुवारी या दोन महिन्यांच्या काळात विनाहेल्मेट १६ दुचाकी चालकांचा मृत्यू झाला, तर तब्बल ३८ जण गंभीर जखमी झाले. 
 
रस्ते आपघातात मृत्यू टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हेल्मेट सक्ती केली आहे. या आदेशानुसार पोलिस आणि अारटीओ प्रशासनाकडून हेल्मेट सक्तीसाठी प्रभावी जनजागृती केली जात आहे.
 
हेल्मेट वापरणाऱ्या वाहनचालकांना दुप्पट दंड आकारण्याचे आदेश दिले आहेत, तरीही वाहनचालकांकडून हेल्मेट वापराबाबत निरुत्साह दिसून येत असल्याने दोन महिन्यांत विनाहेल्मेट अपघातात १६ दुचाकी चालकांचा मृत्यू झाला. तर ३८ जण गंभीर जखमी झाले. दोन दिवसांपूर्वी महात्मानगर येथे श्वान आडवे आल्याने भरधाव जाणारा विनाहेल्मेट दुचाकीचालक ठार, तर एक गंभीर जखमी झाला हाेता. 
 
शहरात दोन महिन्यांमध्ये अपघातांच्या संख्येत घट झाली असली तरी ३४ अपघातांमध्ये दुचाकीचे सर्वाधिक १४ गुन्हे आहेत. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी वाहतूक विभागाला हेल्मेट सक्ती कारवाई अधिक प्रभावीपणे राबवण्याचे आदेश दिले आहेत. सहायक आयुक्त जयंत बजबळे यांच्यासह वाहतूक विभागाचे अधिकारी कर्मचारी शहरात हेल्मेट सक्तीची धडक कारवाई राबवत आहेत. 

स्वत:सह इतरांच्या सुरक्षेची काळजी घ्या 
-वाहन चालकांनी आपल्यासह रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येकाच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. दुचाकी चालवताना हेल्मेट अनिवार्य अाहे. मात्र, तरुणांमध्ये याबाबत उदासीनता आहे. चालकांनी स्वत:सह इतरांच्या सुरक्षेसाठी हेल्मेटवापरावे. - डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त 
बातम्या आणखी आहेत...