आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्मेट सक्ती स्वागतार्ह, मात्र पाेलिसांची दंडेही निषेधार्ह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी सुरू केलेल्या हेल्मेट सक्ती माेहिमेला काही पोलिस कर्मचाऱ्यांकडूनच गालबोट लावण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडल्याने या माेहिमेकडे आता संशयाने बघितले जात आहे. शहरात ‘डी. बी, स्टार’ने शनिवारी (दि. ३) केलेल्या पाहणीत वाहनचालकांकडून नियमबाह्य पद्धतीने दंडाची वसुली केली जात असल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, खिशात पाचशे रुपयेही नसल्याने काही वाहनचालकांनी दंड भरण्यासाठी धनादेश देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला स्पष्ट नकार देत वाहतूक पोलिसांनी थेट गच्ची धरून त्यास अपमानास्पद वागणूक दिली.
पोलिस आयुक्त डाॅ. रवींद्रकुमार सिंघल यांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाला सर्वच स्तरावर कौतुक करत पाठिंबा देण्यात आला. मात्र, मुंबईनाका परिसरात हेल्मेट सक्तीच्या नावाखाली वाहनचालकांना दोन प्रकारचे दंड भरावे लागल्याचे समोर आले. हेल्मेटविना वाहन चालविले म्हणून ५०० रुपये दंडाची आकारणी केली गेली. त्याचबराेबर अनेकांची वाहने टोइंग करून वाहतूक शाखेच्या कार्यालयात नेल्याने तेथेही २७० रुपये भरावे लागले. यामुळे हेल्मेट सक्ती बाजूलाच राहिली आणि वसुलीच जोरात सुरू झाल्याची चर्चा अाहे.

अॅम्ब्युलन्स चालकाला मारहाण
तातडीने रुग्णाला नेण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे ठेवलेल्या रुग्णवाहिककडे दुचाकीवरून जाणाऱ्या रुग्णवाहिका चालकालाही मुंबईनाका पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षकाने अडवून त्याला हेल्मेट नसल्यामुळे दंड भरण्याचे सांगितले. मात्र, रुग्णवाहिकाचालकाने पैसे नसल्याचे सांगितल्याने त्याला मारहाण करत पोलिस ठाण्यात दिवसभर बसविण्यात आल्याची घटना घडली. दरम्यान, जिल्हा रुग्णालयाजवळीत रुग्णवाहिकेत असलेल्या रुग्णाला दुसऱ्या रुग्णवाहिकेतून पाठविण्यात आले.


बातम्या आणखी आहेत...