आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: पाच प्रमुख मार्गावरील मद्य दुकाने वाचवण्यासाठी ‘सरकारी’ धडपड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सर्वाेच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून ५०० मीटर अंतरावर मद्य दुकानांना बंदी केल्यानंतर आता त्यातून सवलत मिळवण्यासाठी असे मार्ग महापालिकेच्या अखत्यारीत आहेत की नाही, याबाबत राज्य शासनाने पाठवलेल्या पत्राला उत्तर दिले अाहे.
 
या पत्रातील तपशील बघता राज्य शासनाने ठरवले तर शहरातील पाच प्रमुख मार्गावरील दारु दुकाने सुरू होण्याची शक्यता आहे. त्यातील तीन मार्गावरील रस्ते महापालिकेकडे देखभालीसाठी हस्तांतरीत झाल्याचे चित्र असून दोन मार्गाबाबतचे अभिलेख उपलब्ध झालेले नाही.
 
सर्वाेच्च न्यायालयाने महामार्गावरील वाढत्या अपघाताला जबाबदार धरत राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून ५०० मीटर अंतरापर्यंत मद्य दुकानांना परवानगी नाकारली. देशभरात हा निर्णय लागू होणार असल्यामुळे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात मद्य दुकाने बंद झाली. दरम्यान, शहरातून पाच प्रमुख राज्य महामार्ग जात असून याचठिकाणी मोठ्या प्रमाणात, बिअर व वाईन शॉप, बार तसेच परमिट रूम असल्यामुळे त्यांनाही बंद करणे भाग पडले.

दरम्यान, राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या कचाट्यातून सुटण्यासाठी महापालिका क्षेत्रातील मार्गावर स्थानिक प्राधीकरणाचा हक्क व मालकीचा मुद्दा उपस्थित करून सवलतीसाठी प्रयत्न सुरू झाले. नाशिकमधील मद्य विक्रेत्यांनी त्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू केला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने नाशिक महापालिकेकडून रस्ते हस्तांतरण मालकीबाबतची माहिती मागवली. महापालिकेने नुकताच हा तपशील पाठवला असून त्यात पाचपैकी तीन प्रमुख मार्ग महापालिकेकडे देखभाल दुरुस्तीसाठी असल्याचे कळवले आहे. त्यामुळे आता या देखभालीच्या मुद्यावर या रस्त्यावरील बंद पडलेली दारू दुकाने सुरू करण्यासाठी राज्य शासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.
 
नाशिक-औरंगाबादरोडवर मात्र काेंडी : नाशिकऔरंगाबाद रोड मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येतअसल्याचे पालीका अहवालारून दिसत आहे. पालीकेने या रस्त्याची मालकी धुडकावली आहे. त्यामुळे या रस्त्यालगतची दारू दुकाने मात्र बंद ठेवण्यावाचून गत्यंतर नाही.
 
राजकीय हस्तक्षेप वाढला : बंदझालेल्या दारू दुकानांचा संबंध काही राजकीय नेत्यांशी असल्याची चर्चा अाहे. अशा वजनदार नेत्यांनी राजकीय ताकद पणाला लावत दारू दुकाने सुरू करण्यासाठी कायदेशीर हत्यार उपसले अाहे. कायद्यातील पळवाटावर बाेट ठेवत प्रामुख्याने न्यायालयाच्या निर्णयातून सुटकेसाठी धडपड सुरू असल्याचे बाेलले जाते.

शासनाकडूनच पालिकेच्या खांद्यावर बंदूक
सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दारू दुकाने बंद झाल्यास मोठ्याप्रमाणात महसूल बुडणार आहे. त्यामुळे राज्य शासनाकडूनच दारू दुकाने वाचवण्यासाठी मध्यंतरी पुढाकार घेतला जात असल्याचे आरोप होत होते. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी भाजपावर शरसंधान साधताना त्याकडे लक्ष वेधले होते.

दरम्यान, रस्ते नेमके कोणाचे याबाबत कोणताही मुद्दा नसताना राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिकेकडून अहवाल मागवल्यामुळे प्रकरणाबाबत संशय व्यक्त होत आहे. शासन  पालिकेच्या खांद्यावर बंदुक ठेवत असल्याची चर्चा असून त्यानुसार  देखभाल दुरूस्ती करणे म्हणजे मालकी होणे असा अर्थ काढून रस्ते पालीकेकडे हस्तांतरीत झाल्याचा निष्कर्ष काढला तर मात्र दारू दुकाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त होत आहे.

एकत्रित राजपत्र का नाही?
पालिकेतील उच्चपदस्थांच्या माहितीनुसार, राष्ट्रीय व राज्य महामार्ग बांधण्यापासून तर त्याच्या मालकी व अन्य तपशील राज्याच्या बांधकाम खात्याकडे असणे अपेक्षित आहे. राष्ट्रीय महामार्गाबाबत विचार केला तर नॅशनल हायवे अथाॅरीटीचा संबंध येतो. या पार्श्वभुमीवर राज्य शासनाने जर असे रस्ते महापालिका क्षेत्रातील असल्याचे गृहीत धरून स्थानिक प्राधीकरणाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला असेल तर याबाबत एकत्रित राजपत्र काकाढले नाही, असा सवाल केला जात आहे. जळगाव महापालिका क्षेत्रातील रस्ते एका राजपत्राद्वारे स्थानिक प्राधीकरणाकडे दिले असल्याने नाशिकबाबत तसाच निर्णय असेल तर एकत्रित राजपत्र का काढले नाही असाही प्रश्न आहे. मुख्य म्हणजे, शासनाकडे राज्य मार्गाच्या मालकीपासून सर्व माहिती असताना उगाच महापालिकेकडून देखभालीचा मुद्दा वदवून घेण्यामागे काय कारण असाही सवाल केला जात आहे.

अाम्ही फक्त माहिती पाठवली
राज्य मार्गाच्या हस्तांतरणाबाबत स्थिती काय, याची माहिती शासनाने मागवली व अाम्ही फक्त ती पाठवली. निर्णय त्यांच्याकडूनच हाेणार अाहे.
- किशाेर बाेर्डे, अतिरिक्त अायुक्त, मनपा.
 

पुढील स्‍लाइडवर वाचा,
- हे आहेत मार्ग ; अशी पळवाट
- मालेगाव स्टॅण्डवरील मद्य दुकान सात दिवसात बंद न केल्यास तीव्र अांदाेलन
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...