आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एचअाेअाय’च्या पाच संचालकांना अटक, ५.५ काेटींचे फसवणूक प्रकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या (एचअाेअाय) पाच संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि. ६) शहरातील विविध भागांतून अटक केली. कंपनीच्या ६० गुंतवणूकदारांच्या तक्रारीनुसार कोटी ६० लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. यात गुंतवणूकदार आणि फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या संचालक महेश नेरकर, भगवान कोठुळे, अनिल कोठुळे, दर्शन शिरसाठ, रवी दळवी या संशयित संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील पंचवटी, सिडको, अंबड आणि तपोवन भागातून अटक केली. कंपनीच्या संचालकांच्या विरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुंतवणूकदारांना वर्ल्ड ट्रेड सेंटर, ड्रॅगन पार्क, गोल्डन हार्वेस सिटी हे व्यावसायिक संकुल उभारत यामध्ये गुंतवणूक करण्याचे अामिष देत दरमाह व्याज देण्याचे अामिष दिले. काही पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत दामदुप्पट देण्याचे अामिष देत गुंतवणूकदारांची फसवणूक केली. आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्ह्याचा तपास सुरू असताना काही गुंतवणूकदारांनी संशयित संचालकांची माहिती पोलिसांना दिली. या माहितीच्या अाधारे पोलिसांनी संशयित पाच संचालकांना अटक केली. कंपनीचे चार संचालक अद्याप फरार आहेत. त्यांच्या मागावर पथक रवाना करण्यात आले आहे. सकाळपर्यंत आणखी चार संचालकांना अटक होण्याची शक्यता आहे. सहायक आयुक्त सचिन गोरे, निरीक्षक विजय पन्हाळे, हेमंत सावंत, राजू मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

फसवणुकीचाआकडा वाढणार
कंपनीच्याविरोधात तक्रारदारांची संख्या वाढली आहे. ६० गुंतवणूकदारांच्या तक्रारीनुसार कोटी ६० लाखांची फसवणूक झाली आहे. कंपनीत विविध योजनांमध्ये गुंतवणूक केलेल्या तक्रारदारांची संख्या वाढत आहे. फसवणुकीचा आकडा सुमारे ५० कोटींच्या वर जाण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

राजकीय वरदहस्त
संचालकांनाराजकीय वरदहस्त असल्याने संचालक मोकाट फिरत होते. पोलिस आयुक्तांनी या प्रकरणी दखल घेत या गुन्ह्यातील संशयितांना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते. दोन दिवसांपासून पथकाकडून संशयितांचा शोध सुरू होता. यातील अटक आणि फरार संशयित कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, राजकीय नेत्यांचे नातेवाईक आहेत.
बातम्या आणखी आहेत...