आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाेळीसाठी वृक्ष ताेडणाऱ्यास अाता थेट तुरुंगवास, पर्यावरणाला धाेका पाेहाेचत असल्याचे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- हाेळीच्या निमित्ताने शहर परिसरात सर्रासपणे वृक्षताेड सुरू झाली असून, त्यामुळे पर्यावरणाला माेठ्या प्रमाणात धाेका निर्माण हाेण्याची शक्यता निर्माण झाली अाहे. या पार्श्वभूमीवर अवैधरीत्या वृक्षतोड केल्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी १००० ते ५००० रुपये दंड, तसेच एक आठवडा ते एक वर्षापर्यंत तुरुंंगवासाची शिक्षा होऊ शकते. या संदर्भात प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या वतीनेही जनजागृती सुरू अाहे. 
 
हाेलीकाेत्सवासाठी अाजही अनेक ठिकाणी लाकडांचा वापर करण्यात येताे. त्यामुळे झाडांच्या फांद्या ताेडण्याकडे संबंधितांचा कल असताे. शहराच्या बाजूला असलेली झाडेच्या झाडे हाेळीनिमित्त ताेडण्यात अाली अाहेत. गाेदाकाठ परिसरातही वृक्ष ताेडण्यात अाल्याचे दिसते. वास्तविक, अवैधरीत्या वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात कारवाईचे अादेश उच्च न्यायालयाने दिले अाहेत. 
 
महाराष्ट्र वृक्षसंरक्षण संवर्धन अधिनियम १९७५ च्या तरतुदीनुसार पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही झाड तोडण्यास बंदी घालण्यात अाली आहे. या संदर्भात प्रदूषण नियंत्रण महामंडळ तसेच पर्यटन विभागानेही जनजागृतीपर पत्रके प्रसिद्ध केली अाहेत. होळीच्या पार्श्वभूमीवर वृक्ष तोडणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करीत थेट तुरुंगात टाकण्याचीही तरतूद असल्याचे या जागृती पत्रकात म्हटले अाहे.
 
नियमानुसार शहरात कोणत्याही ठिकाणी कोणाच्याही परवानगीशिवाय वृक्षतोड केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊ शकते. तसेच, संबंधितांवर महापालिका प्रशासनाच्या उद्यान विभागाद्वारे थेट पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात येतो. यामुळे अाता हाेळीसाठी वृक्ष ताेडणाऱ्यांची गय नसल्याचे दिसते. 
 
लाकडांएेवजी गाेवऱ्यांचा वापर 
हाेळीच्या काळात शहर परिसरातही माेठ्या प्रमाणात वृक्षताेड केली जाते. त्यात हाेळीत लाकडेही जाळण्यात येत असल्याने प्रदूषणात अधिक वाढ हाेते. या पार्श्वभूमीवर यंदा काही सामाजिक संस्थांनी येत्या रविवारी (दि. १२) साजरी हाेणारी हाेळी पर्यावरणस्नेही पद्धतीने करण्याचे नियाेजन केले अाहे. हाेळीत लाकडांचा वापरच करण्याचा निर्णय काहींनी घेतला अाहे. काहींनी वाळलेल्या झाडांची लाकडे कमी प्रमाणात वापरण्याचे ठरविले अाहे, तर काहींनी लाकडांएेवजी शेणाच्या गाेवऱ्यांचाच वापर करण्याचे ठरविले अाहे. 
 
तक्रारींची दखलच घेतली जात नाही 
शहरात सर्रासपणे वृक्षताेड हाेत असताना संबंधितांवर कडक कारवाई हाेणे अपेक्षित अाहे. प्रत्यक्षात महापालिका प्रशासनाकडूनही अशा व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केली जाते. बऱ्याचदा राजकीय दडपण असल्यामुळे प्रशासनाकडून गुन्हे दाखल हाेत नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे नागरिक अाता वृक्षताेड हाेत असल्यास तक्रारी करण्यास पुढे धजावत नाहीत. परिणामत: वृक्षताेड करणाऱ्यांना ते फावत असल्याचे बाेलले जाते.
बातम्या आणखी आहेत...