आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ अाधारकार्डावरून पत्ता शाेधत चार ताेळे साेने परत, \'दिव्य मराठी हिरो\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एका प्रवासी महिलेची गाडीत विसरलेली चार ताेळे साेन्याचे दागिने असलेली पर्स संबंधित महिलेचा पत्ता शाेधून परत करण्याचा प्रामाणिकपणा एका कारचालकाने दाखवला. या कारचालकाचा पाेलिसांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात अाला.   

वडाळा गावातील तैजिब शेख चांद हे मालेगाव येथून पत्नी फरीन शेख व मेहुणी शाहीन शेख यांना घेऊन खासगी कारमधून नाशिकला येत  हाेते. द्वारका येथे वाहनमालक राजेंद्र केदारनाथ शर्मा यांना भाड्याचे पैसे देऊन हे तिघे उतरले. मात्र घाईगर्दीत फरीन शेख यांची पर्स कारमध्येच राहिली. या पर्समध्ये ४ तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व ३०० रुपये होते. हा प्रकार लक्षात अाल्यानंतर शेख यांनी पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. 
 
मात्र कारचा नंबर त्यांना माहिती नव्हता. दुसरीकडे कारमालक शर्मा यांना घरी गेल्यावर गाडीत ही पर्स दिसून अाली. त्यामध्ये फरीन शेख यांचे अाधार कार्डही हाेते. त्याअाधारे शर्मा यांनी शेख यांचा शाेध घेऊन त्यांच्या घरी जाऊन दागिन्यांसह पर्स करत केली. त्यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाबद्दल शेख यांनी शर्मा यांचे अाभार मानले. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, दिव्य मराठी हिराे... 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...