आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोका: 7 रुपयांच्या इथेलिनमध्ये 700 अांबे पिकतात, वाचा नैसर्गिक अांबा कसा पिकताे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खवैयांसाठी दिवसेंदिवस अांबा जीवघेणा हाेत असल्याचे धक्कादायक चित्र डी. बी. स्टारच्या पाहणीत स्पष्ट झाले अाहे. कैरीचा अांबा लवकरात लवकर करून ताे चढ्या भावाने बाजारात अाणून अधिकाधिक फायदा मिळविण्याच्या जीवघेण्या प्रवृतीने नागरिकांचे अाराेग्य मात्र धाेक्यात जात अाहे. केवळ रुपयांच्या इथेलिन पावडरने एकाचवेळी तब्बल ७०० अांबे पिकवले जातात अाणि ते तत्काळ बाजारातही अाणले जातात असा अनियंत्रित उद्याेग अांबा उत्पादकांपासून ते अांबा विक्रेत्यांपर्यंतच्या साखळीत सुरू अाहे. अशा या कृत्रिमरित्या पिकविलेल्या अांब्याने मात्र कळत-नकळत अनेक अाजारांचा सामना खवैयांना करावा लागताे. एकूणच अांब्याच्या या अांबटपणावर वेधलेले हे लक्ष... 
 
नाशिक - रसायनांच्या माध्यामातून आंबे पिकविण्याचा जीवघेणा ‘उद्योग’ आजही बिनदिक्कतपणे सुरू असल्याने, यंदाही फळांच्या राजाला रसायनांचा गोडवा असल्याची धक्कादायक बाब डी. बी. स्टारच्या पहाणीत पुढे आली आहे. फळभाजी उत्पादनातील रासायनिक खतांमुळे होत असलेल्या दुष्परिणामांचा आरोग्याला लागलेला फास सुटत नसतानाच आता ही फळे पिकविण्यासाठीही रसायनांचा बेसुमार वापर होत असल्याने निसर्गाची ही देण मानवी हस्तक्षेपामुळे लाभदायी नव्हे तर घातक ठरू पाहते आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी अन्न औषध प्रशासनाने शहरात केलेल्या कारवाईत आंबे पिकविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कार्बाईडचा मोठा साठा जप्त केला होता. त्यानंतर कार्बाइडवर थेट निर्बंध आल्यावर आंबे पिकविण्यासाठी इथिलीक गॅसचा वापर होऊ लागला. एसी असलेल्या एका बंद खोलीत ठराविक प्रमाणात हा गॅस सोडून त्याद्वारे आंबे पिकविले जातात. मात्र, आर्थिक लाभापोटी अधिक प्रमाणात या गॅसचा वापर करून लवकरात लवकर आंबे पिकविण्याचा उद्योगही काही महाभाग बेमालूमपणे करत आहेत. हे सारे शरीरासाठी अत्यंत घातक असतानाही यावर नियंत्रण ठेवणारा विभाग मात्र केवळ हातावर हात ठेवून बसला आहे. त्यामुळे चेंबर मालक व्यापाऱ्यांचे चांगलेच फावते आहे. पैसे कमविण्याच्या नादात नागरिकांच्या अाराेेग्याशी खेळण्याच्या या प्रकारावर डी. बी. स्टारचा हा प्रकाशझाेत.... 
 
पुढील स्लाईडवर वाचा, 
- रासायनिक स्प्रेचा होतोय वापऱ
- चेंबरमध्ये या निकषांद्वारे पिकतात अांबे
- नैसर्गिक अांबा असा पिकताे
- कृत्रिम पिकविलेल्या आंब्याचे दुष्परिणाम
- डाॅक्टर, नागरिक, गृहिणी, विक्रेते , घाऊक विक्रेते काय म्हणतात...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...