आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीचा आज मराठीचा पेपर; एक लाख २५ हजार विद्यार्थी होणार प्रविष्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून, बुधवारी (दि. १) हिंदी विषयाची परीक्षा झाली. नाशिक विभागातील विविध केंद्रांवर ३५ हजार विद्यार्थी हिंदी विषयाच्या परीक्षेसाठी प्रविष्ट राहिले होते. या पेपरसाठी जळगाव जिल्ह्यात गैरप्रकार आढळले असून, दोन कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांवर भरारी पथकाने कारवाई केली आहे. बारावीचा परीक्षेत गुरुवारी (दि. २) मराठी विषयाची परीक्षा होणार असून, एक लाख २५ हजार विद्यार्थी प्रविष्ट राहणार आहेत. शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजून घेण्यासाठी १० मिनिटे अतिरिक्त दिल्याने परीक्षार्थींना त्याचा फायदा झाला. 
 
बारावीच्या परीक्षेसाठी विभागात एक लाख ६८ हजार २८७ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. शिक्षण मंडळातर्फे विद्यार्थी पालकांसह शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी विभागीय मंडळाने मदतवाहिनी कार्यान्वित केली आहे. त्यासाठी ०२५३-२५९२१४३ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथके नियुक्त करण्यात आले असून, कॉपी करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. विद्यार्थ्यांना ताणतणावांचे व्यवस्थापन समस्यांचे आणि शंकांचे निरसन करण्यासाठी नाशिकसाठी बावा किरण रामगीर (९४२३१८४१४१) यांच्याशी संपर्क साधता येईल. 
बातम्या आणखी आहेत...