आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुक्‍क्‍याचा धूर, मद्याचा पूर; पोलिसांकडे नियमावलीच नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सर्वाेच्च न्यायालयाने बंदी उठवली असली तरी नेमके नियम काय त्याचे पालन करून घेणाऱ्या नियंत्रकांबाबत संदिग्धता असल्यामुळे नाशिक शहरालगत तसेच गंगापूरराेड परिसरात अाजघडीला दहा ते बारा हुक्का पार्लर झाेकात फाेफावत असल्याचे धक्कादायक चित्र अाहे.
 
हुक्क्यासाठी वेगळा कक्ष असण्यापासून येथे १८ वर्षांखालील मुलांना प्रवेश देण्याचे नियम झुगारले जात अाहेत. अक्षरश: कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीच या ठिकाणी डेरा टाकून बसत असल्याचे डी. बी. स्टारच्या पाहणीत उघडकीस अाले अाहे. विशेष म्हणजे, हुक्क्याचा धूरच काढला जात नसून साेबत अनधिकृतरित्या मद्यविक्रीही सुरू अाहे. ही ठिकाणे पाेलिसांना माहीत असूनही अाेरड झाल्यानंतर किरकाेळ कारवाईचे मलम त्यांच्याकडून लावले जात अाहे. डी. बी. स्टारचा त्यावर प्रकाशझाेत.... 

गेल्या काही दिवसांत हुक्क्याची क्रेझ वाढत चालली असून ही बाब अत्यंत धाेकेदायक अाहे. सिगारेटच्या तुलनेत हुक्का चांगला असे चुकीचे समर्थन तरुण पिढीकडून केले जात अाहे. हुक्का पिणाऱ्यांमध्ये महाविद्यालयीन तरुण खासकरून तरुणींची संख्या अधिक अाहे. अभ्यासाचा तणाव घालवण्यासाठी हुक्का अाेढण्यासारख्या सबबी सांगितल्या जात अाहेत. मोठ्या प्रमाणात होणारी शारीरिक आणि मानसिक हानी याकडे दुर्लक्ष करून तरुण हुक्का पार्लर्सकडे वळताना दिसतात. त्यात प्रामुख्याने अल्पवयीन मुला-मुलींचा याकडे वाढणारा ओढा चिंताजनक आहे.
 
अतिशय सहजरित्या उपलब्ध असणारा पैसा, हुक्का पार्लर्सची रोजच्या येण्या-जाण्याच्या रस्त्यावर असणारी उपलब्धता आणि फोफावणारे प्रस्थ या गोष्टी या व्यसनाच्या प्रसारणासाठी कारणीभूत ठरत आहेत. पूर्वी सांस्कृतिक, धार्मिक ओळख असणारे नाशिक आता हळूहळू रेव्ह पार्टीजकडे वळू लागले आहे. कोणाचीही भीडभाड बाळगता, कारवाईचे परिणाम लक्षात घेता सुरू होणारे नवीन नवीन हुक्का पार्लर्स नाशिकच्या तरुणांना धुरात ढकलत आहेत. 
 
व्‍यावसायिकांपेक्षा पिणा-यांवर कारवाईचा उफराटा प्रकार 
प्रसंग पहिला... महात्मानगरच्या एका हुक्का पार्लरमधून पोलिसांनी ३-४ गाड्या भरून तरुणांना ताब्यात घेतले. दाेन तासांनी या मुलांची चौकशी करून त्यांना सोडण्यात आले. मात्र, हुक्का पार्लरवर बंदी आहे की काय? किंवा मालकाला ताब्यात घेण्याचे कोणतेही ठोस कारण देता केलेली ही कारवाई संशयास्पद होती. 

प्रसंग दुसरा.. नाशिकमधील चांदसी येथील प्रसिद्ध हुक्का पार्लरमध्ये पोलिसांनी जाऊन पाहणी केली, ग्राहकांना पळवून लावले. मात्र, त्यांना ताब्यात घेतले नाही. हे हुक्का पार्लरदेखील पूर्ववत सुरू राहिले. ही कारवाई नक्की कोणाला दाखवण्यासाठी आणि कशासाठी झाली याचे गुपित कायम राहिले. 
 
नियमावलीच नाही : शहरातील मध्यवर्ती ठिकाणांवर सुरू असणाऱ्या हुक्का पार्लर्समुळे महाविद्यालयीन विद्यार्थीदेखील सहज या ठिकाणांवर पोहोचू शकतात. या हुक्का पार्लरबद्दल पोलिस प्रशासनाकडे कोणत्याही प्रकारची नियमावली नाही. हुक्का पार्लर नक्की शहरापासून किती अंतरावर असावेत, त्यांची वयोमर्यादा किती असावी, येथे मद्यविक्री करण्यास बंदी आहे की नाही? या प्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित होतात. शहरात ज्या ठिकाणी हुक्का पार्लर आहेत, त्या ठिकाणी मद्यविक्रीदेखील केली जाते. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे वयाचे पुरावे तपासले जात नाहीत. त्यामुळे या प्रश्नाकडे कानाडोळा केला जात असल्याचे चित्र पहायला मिळते. पोलिसांनी काही दिवसांपूर्वी शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या एका हुक्का पार्लरवर रेड टाकली, मात्र येथे कारवाई काहीच झालेली नाही. नक्की हुक्का पार्लरच्या नियमावली काय आहेत याबद्दलच्या अस्पष्टतेने शहरात फोफावणारा हा नवा राक्षस लवकरच तरुणांच्या आयुष्यात थैमान घालणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. 
 
कोळशाचे परिणाम... 
हुक्कापार्लर्समध्ये चिलम पेटवण्यासाठी वापरला जाणारा लाकडी कोळसा हा शरीरासाठी अतिशय हानिकारक असतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन मोनॉक्साइड, मेटल्स आणि कॅन्सरकारक केमिकल्स हे शरीराला घातक आहेत. एका तासामध्ये साधारण १० वेळा हा कोळसा बदलला जातो, त्यामुळे तीन लोकांसाठी दिला जाणारा एक पॉट या तीनही लोकांच्या जिवावर बेतण्यासाठी पुरेसा आहे. 
 
एक तास हुक्का, आयुष्याला धोका... 
फक्त एक तास चालणाऱ्या हुक्क्यामध्ये २०० झुरके घेतले जातात. जे की एका सिगारेटमध्ये २० झुरके असतात. हुक्क्यामुळे शरीरात जाणारा धूर हा ९० हजार मिलिलिटर असतो, तर सिगारेटचा धूर या तुलनेत ५०० ते ६०० मिलिलिटर असतो. या प्रमाणात पहायला गेल्यास हुक्का सिगारेटपेक्षा धोकादायक असल्याचे दिसते. पण, व्यसनाधीन तरुणांच्या हे लक्षातच येत नाही अाणि त्याचे प्रमाण वाढत जाते. 
 
बाकी व्यसनांपेक्षा प्रभावी.. 
दारू,सिगारेट, विडी, व्हाइटनर या व्यसनांपेक्षा हुक्का आणि चिलम ही व्यसने लवकर भिनतात. तरुणांच्या भाषेत लवकर किक बसते. शिवाय एकदा हुक्का अाेढला की सारखा अाेढावासा वाटताे. त्यामुळेच नाशिकमध्ये हुक्का पार्लर माेठ्या प्रमाणात पसरत अाहेत. शहरातील काेणत्याही भागात जा, त्या ठिकाणच्या एखाद्या तरी हाॅटेलमध्ये हुक्का मिळताेच, शिवाय त्याच्याबराेबर मद्यही मिळू लागले अाहे. 
 
पैशाचा धुरळा.. 
एका हुक्का पॉटची किंमत साधारण ४५० रुपयांपासून सुरू होत २५०० रुपयांपर्यंतही आहे. शिवाय हुक्का घरी तयार करण्यासाठी मिळणारे इतर साहित्यही अतिशय स्वस्तात आणि सहज नाशिकमध्ये उपलब्ध होत आहे. त्यामुळे हा प्रकार वाढल्याचे दिसते. हुक्क्याबराेबर मद्य अाणि इतर व्यसनांचे पदार्थही मिळतात. त्यामुळे हुक्का पार्लरची चांगलीच चलती अाहे. याकडे मात्र संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष अाहे. 
 
येथे अाहेत हुक्का पार्लर... 
महात्मानगर, गंगापूररोड, मखमलाबाद लिंकरोड, प्रसाद सर्कल, पाथर्डी रस्ता. 
 
पुढील स्‍लाइडवर...मुलींचे प्रमाण अधिक...  
 
 
 
 

 
 
बातम्या आणखी आहेत...