आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिकच्या पिशवीत मिळते दारू; गाेदापार्कच्याच झाडाखाली बसते मैफल; पाेलिसांचे दुर्लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सकाळीमुलींना ट्रेनिंग देत असताना टोळक्याने मुलींची छेड काढली. याबाबत त्यांना जाब विचारला असता, त्या टोळक्याने अॅथलेटिक्स प्रशिक्षकावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात प्रशिक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना शहरातील गाेदापार्कवर घडली. मात्र, अद्यापही या भागाकडे पाेलिसांचे दुर्लक्षच अाहे. या घटनेनंतर डी. बी. स्टारने अासाराम बापू पूल ते अमरधामपर्यंत पाहणी केली असता गाेदाकाठावर अाणि गाेदापार्कवर मद्य, चरस, गांजाची सर्रास विक्री हाेत असून त्याचे व्यसनही येथेच झाडाखाली वा एखादा अाडाेसा शाेधून हाेत असल्याचे धक्कादायक चित्र पुढे अाले. 
 
महापालिका अाणि पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बापू पूल परिसरात टवाळखोरांचा मुक्त संचार सुरू अाहे. तर काही ठिकाणं ही नित्याचे अड्डे बनले अाहेत. मद्यपी बेधुंदपणे या भागात दिसतात तर महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे अश्लील चाळेही अाता नित्याचे झाले अाहेत. पूर्व विभागात अमरधाम आणि पंचवटी विभागाच्या अमरधामची मागील बाजू तर दारूचे गुत्तेच झाले अाहेत. या ठिकाणी गावठी दारू खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच गर्दी हाेते. या भागात ही दारू प्लास्टिकच्या पिशवीत मिळते. मद्यपी ती खरेदी करून गाेदापार्कचा अाडाेसा गाठतात किंवा मग अापल्याच कारमध्येच दारू पिऊन धिंगाणा करतात. याबराेबरच मुलींचे फाेटाे काढणे, छेड काढणे, स्टंटबाजी या प्रकारामुळे या ठिकाणी बऱ्याचदा वाद हाेऊन थेट हाणामारी होत असल्याने प्रसंग नित्याचेच झाले आहेत. यासंदर्भात पाेलिसांकडे स्थानिकांकडून वारंवार तक्रार देऊनही पाेलिस दुर्लक्षाची भूमिका घेतात. पोलिसांकडून तात्पुरती नाकेबंदी केली जाते, पण त्यातही हेल्मेट, सीटबेल्ट हेच बघून कारवाई हाेते. दाेन दिवसांचा देखावा झाला की, परिस्थिती जैसे थे हाेते. त्यामुळे या भागात कायमस्वरूपी पाेलिस बंदाेबस्त असावा किंवा पाेलिस चाैकीच उभारावी, अशी मागणी अाता जाेर धरत अाहे. 
 
सकाळपासूनच अाडाेशाला मद्यप्राशन 
महाविद्यालयीनवेळेत काही तरुण अापल्या दुचाकींवर परिसरात येतात अाणि सॅकमधील बिअरच्या बाटल्या काढून चक्क रस्त्याच्या कडेला असलेल्या अाडाेशाला बसून मद्य रिचवतात. 
 
गोदापार्क परिसरात एका अॅथलेटिक्स प्रशिक्षकावर चाकूने हल्ला झाल्याची घटना ताजी अाहे. या घटनेनंतर डी. बी. स्टारने या भागात पाहणी केली असता गाेदापार्कवर अाणि गोदाघाटावर दारूची सर्रास विक्री हाेत असल्याची, एवढेच नव्हे तर त्याच ठिकाणी ती दारू रिचवली जात असल्याचे धक्कादायक चित्र गडद झाले. अासाराम बापू पुलापासून ते थेट अमरधामपर्यंत जिथे पाेलिस पाेहाेचणार नाहीत अशा जागा शाेधून हे मद्यपी दिवसरात्र पार्ट्यांमध्ये रंगतात. यावर डी. बी. स्टारने टाकलेला हा प्रकाशझोत... 
 
पाेलिसांचे दुर्लक्ष 
{ बापू पुलाजवळ हल्ल्याची घटना घडली, त्यानंतर पाेलिसांनी काय कार्यवाही केली? 
याघटनेनंतर अाम्ही लगेचच कारवाई केली. संशयितांना तत्काळ ताब्यात घेतले अाहे. या भागातील पुलांजवळ नाकेबंदीही केली जाते. 
{गोदापार्क आणि बापू पुलाजवळ टवाळखोर नित्याचेच अाहेत रात्री मद्यपींच्या पार्ट्याही रंगतात. त्याचे काय? गोदापार्क,बापू पुलाजवळ पेट्रोलिंग सुरूच अाहे. असे कृत्य करणाऱ्या काही लाेकांना ताब्यातही घेतले आहे. या ठिकाणी दारूच्या पार्ट्या करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच या भागात रात्रीची गस्तही वाढविली अाहे. 
{या ठिकाणी पार्ट्यांना लागणाऱ्या दारूची व्यवस्था कुठून हाेते माहिती अाहे का? 
लाेकंकुठूनही दारू अाणू शकतात. मुख्य म्हणजे ही मद्यप्राशनाची जागाच नाही. जवळपासच त्यांना अशी दारू मिळत असावी. त्याचा अाम्ही शाेध घेतच अाहाेत. 
{या लाेकांना पंचवटी अमरधाम परिसरातूनच दारू मिळते? अशी ठिकाणे माहिती अाहेत का? 
अशाचठिकाणांचा अाम्ही शाेध घेत अाहाेत. अमरधाम परिसरात जर अशी अवैध दारू विक्री हाेत असेल तर त्या ठिकाणी तातडीने छापा टाकून कारवाई करू. तसेच गोदाघाटापासून ते गोदापार्क आणि बापू पुलापर्यंत अशा अड्ड्यांची माहिती घेऊन त्यावर कारवाई केली जाईल. 
{एवढ्या घटना घडत असताना या भागात पाेलिस चाैकी का नाही? 
पाेलिसचाैकीचा विषय माेठा अाहे. अापण तत्काळ अशी चाैकी उभी करू शकत नाही. पण अापण गस्त मात्र वाढवू शकताे. पण अशा घटनांमुळे नक्कीच या भागासाठी पाेलिस चाैकी असावी असे अाम्ही वरिष्ठांपर्यंत पाेहाेचविणार अाहाेत. 
 
सर्रासपणे हत्यारे 
या भागात तरुणांकडे चाकू, सुऱ्या, चाॅपर अशी हत्यारे दिसतात. किरकाेळ मारामाऱ्यांतही त्याचा वापर हाेताे. मध्यंतरी काही जणांना पाेलिसांनी जेरबंद केले हाेते.
 
कारमधील पार्ट्यांचे प्रमाण वाढले 
महामार्गापासून ५०० मीटरच्या अात असलेले बार अाणि वाइन शाॅप बंद करण्यात अाल्याने मद्यपी अाता गाेदापार्कच्या रस्त्यावर अापल्या कार उभ्या करून त्यातच पार्ट्या रंगतात. 

रात्री रंगतात अाेल्या पार्ट्या 
अासाराम बापू पूल परिसरात एका खासगी कंपनीच्या माध्यमातून गाेदापार्क विकसित करण्यात अाला. या भागातील अाकर्षक विद्युत राेषणाई, मनमाेहक हिरवळ अाणि स्वच्छ जाॅगिंग ट्रॅक यामुळे शहरवासीय फेरफटक्याला येतात. गेल्या वर्षी गाेदेच्या पुरामुळे गाेदापार्कची वाताहत झाली. त्यात विशेषत: येथील विजेच्या खांबांचे नुकसान झाले. पुरानंतर महापालिकेकडून या भागात काहीच काम झाले नाही. परिणामी या भागात रात्री अंधार असते. त्याचाच फायदा घेत टवाळखाेर, काॅलेजीयन्स येथे रात्रीे ‘अाेल्या पार्ट्या’ करतात. सकाळच्या वेळी परिसरात ठिकठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या दिसतात. 

अमली पदार्थांचे सेवन अन‌् विक्रीचे ठिकाण 
गाेदापार्कला चरस, गांजा अशा अमली पदार्थांची सर्रास विक्री हाेते. याच ठिकाणी तरुण ती खरेदी करून अाडाेसा शाेधत त्याच भागात व्यसन करतात. या भागात व्यसनी लाेकांचा वावर असताे म्हणून परिसरातील नागरिक या भागाकडे फिरकणे टाळतात. त्यामुळे संबंधित मंडळींना अापले ‘उद्याेग’ करण्यासाठी अधिक एकांत मिळताे. पाेलिसांनी कारवाई करावी अशी मागणी हाेत अाहे. 

लक्ष्मीकांत पाटील, पाेलिस उपायुक्त 
नियमित गस्त नाही : पोलिसांकडून गोदापार्क परिसरात नियमित गस्त घातली जात नाही. महाविद्यालयांचे विविध डे किंवा सणावाराला गस्त असते पण, या भागात नियमित पाेलिस दिसत नाही. त्यामुळे टवाळखोरांचा उपद्रव वाढत अाहे. 

धाकच नाही : गंगापूररोडवरील बापू पूल परिसरात तरुणाईकडून सर्रासपणे बाइक्सची स्टंटबाजी हाेते. तर चारचाकी वाहनातही मोठ्या अावाजात गाणी वाजवत रस्त्यावरच डान्स, अश्लील चाळे काही तरुणांकडून हाेतात. पाेलिसांनी कारवाई केली तरी दुसऱ्या दिवशी परिस्थिती जैसे थे असते. 

हद्दीचा प्रश्न : बापू पूल परिसराचा काही भाग पंचवटी पोलिस ठाणे तर काही भाग गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येताे. त्यामुळे हद्दीच्या वादातून पोलिसांकडून इकडचा चेंडू तिकडे टाेलवला जाताे. त्यामुळेच या भागात मद्यपी, गर्दुल्ले अाणि गंुडगिरी वाढली असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त हाेत अाहेत. 
 
 
बातम्या आणखी आहेत...