आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: शहरात दोन ठिकाणी अवैध मद्यसाठा जप्त; दोघांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोरवाडी येथील एका घरात छापा मारत सुमारे सात हजारांचा बोगस मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला. - Divya Marathi
मोरवाडी येथील एका घरात छापा मारत सुमारे सात हजारांचा बोगस मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला.
नाशिक- महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट च्या पथकाने मोरवाडीतील एका घरात छापा मारत सुमारे सात हजारांचा बोगस मद्यसाठा जप्त केला. दोघांना अटक करण्यात आली. तसेच, सरकारवाडा पोलिसांनी घारपुरे घाट येथे एका घरातून अवैध मद्यसाठा जप्त केला. पोलिसांची चाहूल लागल्याने संशयित फरार झाला. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाेलिस पथक अंबड परिसरात गस्त घालत असताना माेरवाडीतील पंडितनगरमध्ये एका घरात अवैध मद्यसाठा असल्याची माहिती मिळाली. घरावर छापा मारत कैलास देवराम उंबरे भारत काशीनाथ जाधव यांना अटक करण्यात आली. वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर, रवींद्र साळुंके यांच्या पथकाने ही कारवाई केली. घारपुरे घाट येथे सरकारवाडा पोलिसांनी एका घरावर छापा टाकला असता संशयित मद्यसाठा घराच्या छतावर फेकून देत फरार झाला. या प्रकरणी हरीश गांगुर्डे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, उपनिरीक्षक अादिनाथ मोरे, संदीप कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 
बातम्या आणखी आहेत...