आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: मद्यपींना महिलांनी दिला चाेप, महाकाली चौकातील देशी दारू दुकान हटविण्याची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - अंबडच्यादातीरनगर येथे महिलांनी बिअर शॉप तोडफोड करून बंद केल्यानंतर सिडकोतील महिलांचाही रणरागिणीचा अवतार पहायला मिळाला. पवननगर, महाकाली चौक येथील देशी दारूच्या दुकानांबाहेर मद्यपान करीत बसलेल्या नागरिकांशी उध्दट वर्तन करणाऱ्या मद्यपींना महिलांनी चांगलाच चोप दिला. 
 
महाकाली चौक येथे एस. बी. ठाकरे शिवम देशी दारू दुकान दत्त चौकातील प्रशांत लिकर देशी दारू दुकान असे सरकारमान्य देशी दारूचे दुकाने आहेत. अनेक वर्षांपासून या दुकानांमुळे महिला नागरिक हैराण झाले आहेत. दररोज मद्यपींचा त्रास सहन करावा लागत असल्याच्यया नागरिकांनी तक्रारी केल्या. मात्र प्रशासनाने आतापर्यंत त्याची कोणतीही दखल घेतली नाही. अखेर महिलांनीच यासाठी पाऊल उचलले आहे. दोन दिवसांपासून काही मद्यपी थेट रस्त्यावर येऊन मद्यप्राशन करीत होते. काहींनी रस्त्यावर लघुशंका करणे, महिलांची छेडछाड करणे, शिवीगाळ करणे असे प्रकार सुरू केले होते. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिलांनी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्याशी संपर्क साधला. सर्वांनी एकत्र येत मद्यपींना चांगलाच चोप दिला. यावेळी निंबा बस्ते, देवचंद केदारे, राजू बाने, मिनाज शेख, वाल्मिक लांडगे, भागवत बडगुजर, डागूबाई दबाडे, मथुरा लांडगे, छाया पवार, इंदुबाई कदम, वत्सला खैरे, मंगला कदम, सिंधूबाई बस्ते, वंदना गोलाईत, वंदना हातगे, मीना पाटील, सविता साळुंखे, नंदा इखे आदीसंह नागरिक उपस्थित होते. 

देशी दारूच्या दुकानांमुळे सिडकोतील शांततेचा भंग हाेत अाहे. तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. 
 
- सिडकोतील देशीदारू दुकानांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार केली आहे. ही दुकाने तत्काळ बंद व्हावीत.
-मुकेश शहाणे, नगरसेवक. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...