आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इनाेव्हा उलटून दाेघांचा मृत्यू, शिवसेना उपमहानगरप्रमुख नीलेश कुलकर्णी यांचा मृतांमध्ये समावेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मित्राचा साखरपुडा अाटाेपून अाैरंगाबादहून परतताना मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तळवाडे गावाजवळ इनाेव्हा उलटून झालेल्या अपघातात शिवसेना उपमहानगरप्रमुख ॲड. नीलेश कुलकर्णी डाॅ. संदीप येवलेकर यांचा मृत्यू झाला. अन्य तिघे या अपघातात जखमी झाले अाहेत.
 
साखरपुडा झालेल्या मित्रासह ते इनाेव्हाने (एम. एच. १५ डी. एम. ८३८४) नाशिककडे परत येताना त्यांचे वाहन नांदगावच्या दिशेने गेले. पुढे तळवाडे गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने इनाेव्हाने चार-पाच पलट्या घेतल्या. यात नीलेश श्रीराम कुलकर्णी (३८, म. गांधी राेड) यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर, डाॅ. येवलेकर (अशाेक स्तंभ) यांना अौरंगाबादच्या घाटी रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले, मात्र त्यांचे प्राण वाचले नाहीत. 
जखमी तरुणांना तातडीने उपचार मिळण्यासाठी उपलब्ध वाहनांनी औरंगाबाद, नांदगाव मालेगाव येथे नेण्यात आले. अंत्ययात्रेस आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, माजी महापाैर विनायक पांडे यतीन वाघ, विनायक खैरे, सतीश शुक्ल अादींसह माेठ्या संख्येने शिवसैनिक सर्व पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित हाेते. कुलकर्णी यांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त करण्यात अाली. 
बातम्या आणखी आहेत...