आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अांतरराष्ट्रीय चित्रपट महाेत्सवात नाशिकचा ‘कावळा’ सर्वाेत्कृष्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सबकुछ नाशिक असलेल्या ‘कावळा’ या चित्रपटाला दिल्ली अांतरराष्ट्रीय चित्रपट महाेत्सवामध्ये ‘बेस्ट फिल्म अाॅफ इयर’ म्हणून निवडण्यात अाले अाहे. विशेष म्हणजे, जगभरातून अालेल्या ८०० चित्रपटांमधून एकूण १८ चित्रपटांची निवड झाल्यानंतर त्यातून ‘कावळा’ला सर्वाेत्कृष्ट ठरवत पुरस्कार जाहीर करण्यात अाला अाहे.
दिल्लीमध्ये ते डिसेंबरदरम्यान पाचवा अांतरराष्ट्रीय चित्रपट महाेत्सव झाला. त्यात नाशिकचेच कलाकार, इथलेच तंत्रज्ञ, इथल्याच मातीत अन् गाेदावरीच्या परिघात घडणारी कहाणी असलेल्या ‘कावळा’ चित्रपटाला हा पुरस्कार प्रदान करण्यात अाला अाहे. नाशिकचे कलाकार अाणि दिग्दर्शक असलेल्या निवास माेरे यांनीच चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद लिहिले असून, त्यांनीच दिग्दर्शनासह निर्मितीची अवघड धुरादेखील सांभाळली अाहे. माणूस जितका सुशिक्षित हाेत अाहे, तितका अधिकच कर्मकांडात गुंतत चालला अाहे. याबाबतचे वास्तव चित्र या चित्रपटातून मांडण्यात अाले अाहे.

गरिबीसह अाजारपणाच्या खर्चात अाधीच हाेरपळलेल्या एका कुटुंबातील वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्यानंतर त्या कुटुंबाची झालेली परवड अाणि त्यातून प्रथेविरुद्ध हाेणारे बंड असा प्रवास या चित्रपटातून दर्शवण्यात अाला अाहे. नाशिकच्याच भूमीत घडणाऱ्या कथेला राष्ट्रीय परिमाण लाभले असून, त्यातूनच हा चित्रपट राष्ट्रीयस्तरावरील परीक्षकांच्याही पसंतीस उतरला.
नाशिकच्याशिरपेचात तुरा : याचित्रपटाचे चित्रणदेखील नाशिकमध्येच करण्यात अाले असून, चित्रपटातील कलाकारदेखील नाशिकमधीलच अाहेत. संगीताची बाजू धनंजय धुमाळ, पार्श्वसंगीत केदार अानंद, सिनेमॅटाेग्राफी रवी जन्नावार, संकलन विजय खाेचीकर, तर सहायक दिग्दर्शक म्हणून नाैशाद सय्यद यांनी काम पाहिले अाहे.

टीमवर्कमुळेच यश
^चित्रपटातील सर्वकलाकार, बालकलाकार अाणि तंत्रज्ञांनी केलेल्या उत्कृष्ट सांघिक कामगिरीमुळेच इतका चांगला चित्रपट तयार करू शकलाे. तसेच, या चित्रपटाला दिल्ली अांतरराष्ट्रीय चित्रपट महाेत्सवात पुरस्कार मिळाल्याने सर्वच नाशिककरांसाठी ही अभिमानास्पद कामगिरी ठरली अाहे. -निवास माेरे, ‘कावळा’चे लेखक, दिग्दर्शक, निर्माते अाणि कलाकार
बातम्या आणखी आहेत...