आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैन विद्यालयात पारितोषिक वितरण; गुणवंतांचा झाला गाैरव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जैन प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरणप्रसंगी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालक शिक्षक उपस्थित होते. - Divya Marathi
जैन प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरणप्रसंगी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालक शिक्षक उपस्थित होते.
लासलगाव- येथील जैन प्राथमिक विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात झाला. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्या स्नेहल ब्रह्मेचा, टीव्हीएसचे संचालक स्वप्नील डुंगरवाल, आयडीबीआय बँकेचे शाखा व्यवस्थापक अभिजित सानप, राकेश बोरा उपस्थित होते.  अध्यक्षस्थान पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे यांनी भूषविले. 
 
मुख्याध्यापिका न. भा. शिंदे यांनी प्रास्ताविकात १९३४ साली शाळेची झालेली स्थापना आणि शाळेने केलेली प्रगती याबाबत माहिती दिली.अध्यक्षीय भाषणात पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे यांनी यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. माझे शिक्षण हे याच शाळेतून झालेले असून, प्रमुख पाहुणे म्हणून मला उपस्थित राहण्याचा सन्मान मिळाल्याचा आनंद होत असल्याचे भाषणातून सांगितले. कला, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात नेत्रदीपक यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष जव्हेरीलाल ब्रह्मेचा, मानद सचिव शांतिलाल जैन, विश्वस्त मोहनलाल बरडिया, सुनील आबड, महावीर चोपडा, अमित जैन, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 
 
 
बातम्या आणखी आहेत...